चित्रीकरण संपवून हॉटेलमध्ये आले ते परत बाहेर आलेच नाहीत; प्रसिद्ध निर्मात्याचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू

फिल्म इंडस्ट्रीवर गेल्या काही दिवसांपासून एकामागोमाग एक दु:खाचा डोंगर कोसळत आहे. कालच अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा अपघातात मृत्यू झाला. तर नितेश पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू जाला. त्यानंतर आज आणखी एका भोजपुरी अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.

चित्रीकरण संपवून हॉटेलमध्ये आले ते परत बाहेर आलेच नाहीत; प्रसिद्ध निर्मात्याचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू
Subhash Chandra Tiwari Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 6:35 AM

लखनऊ : महाराष्ट्रातील इगतपुरी येथे एका हॉटेलमध्ये दिग्दर्शक नितेश पांडे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ माजलेली असतानाच आणखी एका निर्माता आणि दिग्दर्शकाचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातली रॉबर्ट्सगंज येथील एका हॉटेलात भोजपुरी निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष चंद्र तिवारी यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. चित्रीकरण संपवून तिवारी हॉटेलात रात्री उशिरा आले होते. पण बराच वेळ झाला तरी त्यांनी हॉटेलचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांचा रुम उघडण्यात आला असता त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

सुभाष चंद्र तिवारी हे चित्रीकरणाच्यासाठी हॉटेलमध्ये थांबले होते. चित्रीकरण संपवून ते हॉटेलमध्ये आले होते. पण बराच वेळ झाला तरी त्यांनी हॉटेलचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी 112 क्रमांकावर फोन फिरवून पोलिसांना बोलावून घेतलं. रॉबर्ट्सगंज पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनोज कुमार सिंह हे आपल्या लवाजम्यासह हॉटेलात दाखल झाले. त्यानंतर हॉटेलचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले असता त्यांना तिवारी यांचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. पोलिसांच्या सांगण्यानुसार, तिवारी यांचा मृतदेह थंड पडला होता. त्यांचा मृत्यू झाला असं दिसून येत होतं.

हे सुद्धा वाचा

चित्रीकरण संपले होते

पोलिसांनी तात्काळ तिवारी यांना जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तिवारी हे वाराणासीचे रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत राहूनच ते आपलं सर्व काम करायचे. सोनभद्र येथे त्यांच्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं. हा सिनेमा जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे सिनेमाचे क्रू मेंबर, अभिनेत्री आणि अभिनेते आपआपल्या घरी निघून गेले होते. पोलिसांच्या सांगण्यानुसार, पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतरच तिवारी यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, तिवारी यांच्या निधनामुळे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

इंडस्ट्रीला झटका

गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कालच साराभाई वर्सेस साराभाई फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा कार अपघातात मृत्यू झाला. कुलू मनालीला जात असताना तिची कार दरीत कोसळली. तर इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.