Aamir Khan | मी याच देशात राहणार आणि इथेच मरणार आहे, जाणून घ्या आमिर खान असे नेमके का म्हणाला?

बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आमिर खान याचा काही दिवसांपूर्वी लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मोठ्या पडद्यापासून आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून दूर आहे.

Aamir Khan | मी याच देशात राहणार आणि इथेच मरणार आहे, जाणून घ्या आमिर खान असे नेमके का म्हणाला?
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 10:04 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा सतत चर्चेत राहणारा अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वीच आमिर खान (Aamir Khan) याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही आमिर खान हा दिसला. या चित्रपटात आमिर खान याच्यासोबत करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही देखील मुख्य भूमिकेत होती. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर आपला जलवा दाखवता आला नाही आणि आमिर खान याचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. मुळात म्हणजे लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाकडून आमिर खान याला प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

जेंव्हापासून लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेलाय, तेंव्हापासूनच आमिर खान हा बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर गेलाय. इतकेच नाही तर तो कोणत्याही पार्टीला हजेरी लावत नाही. एका मुलाखतीमध्ये आमिर खान याने खुलासा केला होता की, मी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सतत काम करत आहे. यामुळे मी माझ्या कुटुंबाला अजिबात वेळ देऊ शकलो नाहीये, यामुळे मी आता काही वर्ष कुटुंबाला वेळ देणार आहे.

काही दिवसांपूर्वी आमिर खान याचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये आमिर खान याची पांढरी दाढी, पांढरे केस पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. आमिर खान हा नेहमीच वादामध्ये सापडतो. 2015 मध्ये आमिर खान याने एक वादग्रस्त विधान केले होते. आमिर खान याचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेकांनी आमिर खान याला खडेबोल सुनावण्यासही सुरूवात केली होती.

2015 च्या मुलाखतीमध्ये असहिष्णुतेच्या विषयावर बोलताना आमिर खान याने थेट देशात सुरक्षेत वाटत नसल्याचे म्हणत देश सोडण्याची भाषा केली होती. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड टिका झाली. त्यानंतर काही दिवसांनीच एक मुलाखत आमिर खान याने दिली आहे. आपले म्हणणे चुकीच्या पध्दतीने आणि वाढून सांगण्यात आल्याचे आमिर खान याने म्हटले.

आमिर खान म्हणाला होता की, मी याच देशात राहणार आहे आणि याच देशात मरणार आहे. माझ्या पत्नीने मुलांच्या भविष्यासाठी भावूक होत हे म्हटले होते. मी असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे विदेशात एकही घर नाहीये. माझे जे काही चार ते पाच घर आहेत ते फक्त आणि फक्त भारतामध्येच आहेत. मी कुठे जाणार नाहीये. माझ्या बोलण्याचे चुकीचे अर्थ काढले गेल्याचे देखील आमिर खान याने म्हटले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.