अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर नियमांचा भंग, मुंबई पोलिसांकडून कडक कारवाई
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमांचं पालन न केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
गोविंद ठाकुर, मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चित्रपटाच्या सेटवर पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली आहे. काल रात्री मुंबईतील मढ (Madh) दाना-पानी येथे अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी व्हॅनिटी व्हॅन आणि इतर वाहने रस्त्यावर उभी होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रस्तावर लावण्यात आलेली सर्व वाहनं पोलिसांनी लॉक केली. रात्री उशिरा मालवणी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी मिळून शूटिंगसाठी आलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी अक्षय कुमार तिथे नव्हता.त्याआधीच तो आपलं शूटिंग आटपून निघून गेला होता. अवैध पार्किंगची तक्रार ट्विट करून करण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक पोलिस आणि मालवणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
अक्षय कुमारच्या सेटवर पोलिसांची कारवाई
अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर पोलिसांनी कारवाई केली आहे. काल रात्री मुंबईतील मढ दाना पानी येथे अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी व्हॅनिटी व्हॅन आणि इतर वाहने रस्त्यावर उभी होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रस्तावर लावण्यात आलेली सर्व वाहनं पोलिसांनी लॉक केली. रात्री उशिरा मालवणी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी मिळून शूटिंगसाठी आलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी अक्षय कुमार तिथे नव्हता.त्याआधीच तो आपलं शूटिंग आटपून निघून गेला होता.
याबाबत वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेटबाहेरील रस्त्यावर उभी केलेली वाहने आधी हटवण्यास सांगितलं होतं पण त्यानंतरही ही वाहनं हटवण्यात आली नाहीत.त्यामुळे नियमांचा पालन न करता पार्क केलेल्या 20 वाहनांवर दुहेरी कारवाई करण्यात आली आहे. अवैध पार्किंगची तक्रार ट्विट करून करण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक पोलिस आणि मालवणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर पोलिसांनी कारवाई केली आहे. काल रात्री मुंबईतील मड दाना पानी येथे ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी अक्षय कुमार तिथे नव्हता. त्याआधीच तो आपलं शूटिंग आटपून निघून गेला होता.
संबंधित बातम्या