फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर विवाहबद्ध, लग्नाला सेलिब्रिटींची हजेरी

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर आज लग्नगाठ बांधत आहेत. या मोस्ट वेटेड लग्नाला सुरूवात झाली आहे.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर विवाहबद्ध, लग्नाला सेलिब्रिटींची हजेरी
फरहान अख्तर, शिबानी दांडेकर
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 3:44 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आज लग्नगाठ बांधली. हे मोस्ट वेटेड लग्न अखेर आज पार पडलं. खंडाळ्यात या दोघांचं लग्न झालं. अनेक सेलिब्रिटींनी या ग्रॅण्ड वेडिंगला हजेरी लावली. फरहानचे वडिल जावेद अख्तर या लग्नातल्या विविध गोष्टींकडे जातीने लक्ष देत आहेत. फरहान अख्तरचा सगळ्यात जवळचा मित्र अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आपल्या कुटुंबियांसह या लग्नाला हजर आहे. या लग्नाचा पहिला फोटो आता समोर आला आहे.

हृतिक रोशनची हजेरी

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाला अभिनेता हृतिक रोशन आपल्या कुटुंबियांसह हजर आहे. हृतिक आणि फरहानने झोया अख्तरचा ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ हा चित्रपट एकत्र केलं होतं. फरहानने दिग्दर्शित केलेल्या ‘लक्ष्य’या चित्रपटात हृतिकने काम केलं आहे.हा चित्रपट हृतिकच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे.

फरहान अख्तर आणि मॉडेल-अभिनेत्री शिबानी दांडेकर हे मागच्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. ते दोघे अनेकदा एकत्र दिसायचे. त्याचे एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटोही शेअर करताना दिसतात.आता हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत.

लग्नाच्या 17 वर्षांनी घेतला घटस्फोट

फरहान अख्तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चेत असतो. फरहानने 2000 मध्ये अधुना भभानीशी लग्न केले होते. फरहान आणि अधुना यांना दोन मुलेही आहेत. पण 2017 मध्ये फरहान आणि अधुना वेगळे झाले आणि दोघांचा घटस्फोट झाला. फरहान आणि अधुना यांच्यात घटस्फोटाचे कारण फरहानचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले जात होते.

फरहान अख्तरचं करिअर

फरहान अख्तरच्या प्रमुख चित्रपटांबद्दल बोलायचे तर, त्याने ‘दिल चाहता है’, ‘लक्ष्य’, ‘डॉन’, ‘डॉन 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये लेखनाचे काम केले आहे. याशिवाय त्याने ‘डॉन’, ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करत दिग्दर्शकाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर फरहानने ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘मिल्खा सिंग’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे.

संबंधित बातम्या

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर विवाहबद्ध, लग्नाला सेलिब्रिटींची हजेरी

शिवराय साकारणाऱ्या अभिनेत्यांकडून महाराजांना अनोखी मानवंदना, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले…

शिवजयंतीनिमित्त रवी जाधव दिग्दर्शित ‘बाल शिवाजी’ चित्रपटाची घोषणा, चित्रिकरण लवकरच सुरु होणार

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.