ऋतिक रोशन आणि सबा आझादची पहिली भेट कुठे झाली? तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!

हृतिक आणि सबा या दोघांची भेट डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाल्याची चर्चा असल्याची चर्चा होती. पण...

ऋतिक रोशन आणि सबा आझादची पहिली भेट कुठे झाली? तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
हृतिक रोशन, सबा आझाद
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 9:20 AM

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडौमोडींमुळे मागच्या काही दिवसांपासून भलताच चर्चेत आहे. हृतिक आणि गायिका, अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय. त्यांना अनेकदा एकत्र स्टप केलं गेलं. एकदा हृतिक आणि सबा एकमेकांचा हात धरून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. आत्तापर्यंत हृतिक आणि सबा एकत्र दिसत होते मात्र नुकतंच ती हृतिकच्या कुटुंबीयांसोबतही दिसली. सबा, हृतिक आणि हृतिकच्या कुटुंबाने एकत्र जेवण केलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याआधी दोघांची भेट डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाल्याची चर्चा असल्याची चर्चा होती. पण या दोघांची भेट डेटिंग अॅपवर नव्हे तर ट्विटरवर झाली असल्याची माहिती आहे.

ट्विटरवर झाली दोघांची भेट

बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार , सबा आणि हृतिक मागच्या 2-3 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.याआधी दोघांची भेट डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाल्याची चर्चा होती. पण या दोघांची भेट डेटिंग अॅपवर नव्हे तर ट्विटरवर झाली असल्याची माहिती आहे.

सबाकडून हृतिकचे आभार

हृतिक आणि सबा यांची भेट ट्विटरवर झाली असल्याची माहिती आहे. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. याव्हीडिओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले होते आणि मग पर्सनल मेसेजेस सुरू झाले असल्याची माहिती आहे.

सबा कोण आहे?

सबा आझाद ही एक गायिका आणि अभिनेत्री आहे. यासोबतच ती एका बँडचाही एक भाग आहे. याआधी ती नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहसोबत 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जातं. हृतिकची पूर्व पत्नी सुझैन खानलाही सबा आवडते, काही दिवसांआधी सुझैनने सबाचा एक फोटो इन्स्टाग्नामवर शेअर केला होता.

संबंधित बातम्या

Bheemla Nayak Trailer : ‘भीमला नायक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता पवन कल्याण!

“टॉम क्रूझ भयंकर रागीट, तोंडावर फेकला अल्बम”; एक्स मॅनेजरने सांगितला किस्सा

अंबानींच्या मुलाच्या लग्नाला सुप्रिया सुळेंची खास उपस्थिती; फोटो आले समोर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.