AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान याचे नाव घेत महिलेने थेट कतरिना कैफ हिला फटकारले, अभिनेत्रीची केली बोलती बंद

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचा काही दिवसांपूर्वी फोन भूत हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, कतरिना कैफ हिच्या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाल करण्यात यश मिळाले नाही. कतरिना कैफ हिचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. यादरम्यान फक्त कतरिना कैफ हिच नाही तर सोनाक्षी आणि जान्हवी यांचे देखील चित्रपट फ्लाॅप गेले.

सलमान खान याचे नाव घेत महिलेने थेट कतरिना कैफ हिला फटकारले, अभिनेत्रीची केली बोलती बंद
| Updated on: May 04, 2023 | 6:04 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे शाहरुख खान याच्यावर प्रचंड टिका होत होती. शाहरुख खान याचा हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांसोबत सेल्फी न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जाताना दिसतोय. शाहरुख खान याचा हा व्हिडीओ (Video) पाहून अनेकांनी त्याला खडेबोल सुनावले. चाहत्यांमुळेच तू इंथेपर्यंत पोहचल्याचे देखील लोकांनी त्याला बोलून टाकले. शाहरुख खान याचा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) सध्या चर्चेता विषय ठरला असून तूफान व्हायरल होताना दिसतोय.

शाहरुख खान याचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होत असतानाच आता अजून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. मात्र, हा आता जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो शाहरुख खान याचा नसून अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आहे. कतरिना कैफ हिचा हा जुना व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे कतरिना कैफ हिचा देखील शाहरुख खान याच्याप्रमाणेच विमानतळावरील व्हिडीओ आहे.

कतरिना कैफ हिचा हा जुना व्हिडीओ असून या व्हिडीओमध्ये कतरिना कैफ ही देखील चाहत्यांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कतरिना कैफ हिच्या भोवती चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. चाहते कतरिना कैफ हिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, सेल्फीसाठी न थांबता आणि चाहत्यांकडे दुर्लक्ष करून जाताना कतरिना कैफ ही दिसत आहे.

कतरिना कैफ हिला चाहत्यांकडे दुर्लक्ष करून जाताना पाहून तिथे उपस्थित असलेली एक महिला चांगलीच भडकते आणि कतरिना कैफ हिला खडेबोल सुनावण्यास सुरू करते. कतरिना कैफ हिला महिला म्हणते की, तुझे हे वागणे अजिबात बरोबर नाहीये. लोक तुझी एक झलक पाहण्यासाठी आणि फोटो घेण्यासाठी इथे थांबले आहेत.

अगोदर कतरिना कैफ ही या महिलेच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मात्र, पुढे जाऊन कतरिना कैफ म्हणते की, मी एक मोठा शो करून आल्याने मी खूप जास्त थकले आहे. त्यावर ती महिला कतरिना कैफ हिला म्हणते की, हे लोक कितीवेळ झाले थांबले आहेत. यावर कतरिना कैफ ही थेट त्या महिलेला शांत राहण्यास सांगते.

कतरिना कैफ हिने शांत राहण्यास सांगितल्यानंतर ती महिला अधिकच चिडते आणि म्हणते की, असेही आम्ही तुझ्यासाठी नाही तर सलमान खान याच्यासाठी आलो होतो…कतरिना कैफ ही त्या महिलेचे बोलणे ऐकून तिथून थेट निघून जाते. कतरिना कैफ हिचा हा व्हिडीओ तसा जुनाच आहे. मात्र, शाहरुख खान याच्या प्रकरणानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.