अभिनेता रणदीप हुडा मोठ्या अडचणीत, पटकथा लेखिकेने भरपाई म्हणून मागितले 10 कोटी! वाचा नेमकं काय झालं…

एका पटकथा लेखिकेने अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) याच्यावर तिची स्क्रिप्ट परत न केल्याचा आणि नंतर तिला धमकी दिल्याचा आरोप केला आहे. प्रिया शर्मा, ज्या एक गीतकार देखील आहेत, त्यांनी आता अभिनेत्याला कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

अभिनेता रणदीप हुडा मोठ्या अडचणीत, पटकथा लेखिकेने भरपाई म्हणून मागितले 10 कोटी! वाचा नेमकं काय झालं...
रणदीप हुडा
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 1:08 PM

मुंबई : एका पटकथा लेखिकेने अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) याच्यावर तिची स्क्रिप्ट परत न केल्याचा आणि नंतर तिला धमकी दिल्याचा आरोप केला आहे. प्रिया शर्मा, ज्या एक गीतकार देखील आहेत, त्यांनी आता अभिनेत्याला कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

एवढेच नाही, तर माध्यमांच्या अहवालानुसार प्रिया यांनी रणदीपला जाहीर माफी मागायला देखील सांगितले आहे. त्यांनी आपल्या आरोपात असा दावा केला आहे की, अभिनेता रणदीप हुडा आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना एकत्र काम करण्यास राजी केले आणि त्यांनी गेल्या 15 वर्षांमध्ये लिहिलेली पटकथा आणि काही गाणी आपल्या ताब्यात घेतली.

स्क्रिप्ट परत करण्याऐवजी धमकावले

प्रिया यांच्या दाव्यानुसार, त्यांची कथा परत करण्याऐवजी उलट त्यांना धमकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी वारंवार कामाला विलंब केला आणि आता स्क्रिप्ट परत करण्याऐवजी ते लोक आपल्याला धमकी देत असल्याचे प्रिया यांनी म्हटले आहे. माध्यम अहवालांनुसार, रणदीप हुडा सोबत त्याची आई आशा हुडा, मनदीप हुडा, डॉ.अंजली हुडा सांगवान, मनीष (डॉ. अंजलीचे बिझनेस पार्टनर), पांचाली चक्रवर्ती (रणदीपची मॅनेजर) आणि रेणुका पिल्लई (मेकअप आर्टिस्ट) यांना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

फेसबुकवरून झाली मैत्री

प्रियाने तिचे वकील रजत कलसन यांच्यामार्फत रणदीप हुडाला ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रिया 2012मध्ये फेसबुकच्या माध्यमातून रणदीपच्या संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर दोघेही चांगले मित्र झाले आणि त्यांनी कौटुंबिक समस्या एकमेकांसोबत शेअर करण्यास सुरुवात केली.

रणदीपला लक्षात ठेवून लिहिली कथा

काही गप्पांदरम्यान प्रियाने रणदीपच्या आईला सांगितले की, तिने रणदीपला लक्षात घेऊन काही कथा लिहिल्या आहेत, यावर तिला चित्रपट बनवायचा आहे. मात्र, या कथा आधी ती त्यांच्यासोबत शेअर करू इच्छित होती. यावर अभिनेत्याच्या आईने सांगितले की, ती या घराचा एक भाग आहे आणि ती या स्क्रिप्ट पांचाली आणि रेणुकाला पाठवेल कारण त्यांचे प्रॉडक्शन हाऊस लवकरच येणार आहे. यावर अद्याप रणदीप हुडा याच्याकडून कोणताही खुलासा समोर आलेला नाही.

हेही वाचा :

शेवट नव्हे, ही तरी नवी सुरुवात! ‘या’ दिवशी ‘देवमाणूस’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

स्वरा भास्करला डेट करायचा हिमांशू शर्मा, आज कनिका ढिल्लनसोबत जगतोय आनंदी जीवन

कपल गोल्स, रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लाची मूड, मस्ती आणि धमाल

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.