Shah Rukh Khan | शाहरुख खान याच्या घरात चाहता घुसला आणि पुढे काय घडले वाचा…
झिरो चित्रपटानंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यापासून बरेच दिवस दूर होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. झिरो चित्रपटानंतर शाहरुख मोठ्या पडद्यापासून बरेच दिवस दूर होता. शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात असल्याने सध्या चित्रपट निर्माते बिग बजेटचे चित्रपट रिलीज करण्यासाठी धसका घेत आहेत. बाॅलिवूडचा चित्रपट कोणताही असो रिलीज डेट जाहिर झाल्यानंतर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जाते.
चाहते आणि सेलिब्रिटी यांच्यामध्ये खास नाते असते. आपला आवडता अभिनेता काय खातो, काय पितो, त्याचे घर कसे आणि ते लाईफस्टाईल नेमकी कशी जगतात हे जाणून घेण्याची इच्छा नेहमीच चाहत्यांमध्ये असते.
अशावेळी बरेच चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या घरी जाण्यासाठी सतत प्रयत्न करतात. यादरम्यान काय चुकीचे आणि काय बरोबर हे देखील चाहते अनेकदा विसरून जातात.
शाहरुख खानने एका मुलाखतीदरम्यान एका हटके चाहत्याचा एक किस्सा सर्वांना सांगितला. शाहरुख खानच्या घरी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनेक पत्रकार शाहरुखच्या घरी आले होते.
यादरम्यान एक चाहता देखील नजर चुकून शाहरुख खानच्या घरात प्रवेश करतो. विशेष म्हणजे तो शाहरुखच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करतो आणि परत एकदा कपडे घालतो.
सुरक्षारक्षक जेंव्हा याला प्रश्न विचारतात, त्यावेळी तो चक्क म्हणतो की मी फक्त इथे अंघोळ करण्यासाठी आलो होतो. कारण मला शाहरुख याने केलेल्या पाण्यात अंघोळ करायची होती.
घडलेला हा सर्व प्रकार शाहरुख खानला कळतो. त्यानंतर शाहरुख म्हणतो की, मी खाली येतो, त्याला भेटण्यासाठी त्यावेळी तो म्हणतो की, जास्त क्लोज होण्याचा प्रयत्न नका करू. मला जायचे आहे माझे अंघोळ करण्याचे काम झाले आहे.
हा सर्व प्रकार सांगताना शाहरुख खानला हासू आवरत नाही. यामध्ये शाहरुख खानला हे सांगायचे होते की, चाहते देखील विविध प्रकारचे असतात. हा किस्सा आयुष्यभर लक्षात राहिल असेही शाहरुख म्हणाला आहे.