‘गंगुबाई’चा थिएटरात कल्ला, पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, तिकीटही मिळेना!

आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागलेत. अनेक थिएटरमध्ये तिकीटं मिळणं मुश्किल झालंय. ऑनलाईनही तिकिटं बुक होत नाहीयेत.

'गंगुबाई'चा थिएटरात कल्ला, पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, तिकीटही मिळेना!
गंगुबाई काठियावाडी
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 8:10 AM

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांचा गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपट प्रदर्शित झालाय. या सिनेमाविषयी मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा म्हटलं की बिग बजेट भव्यदिव्य सेट… तसाच हा एक सिनेमा आहे. आलिया भटने साकारलेली गंगुबाई काठियावाडीची भूमिका अनेकांना प्रभावित करतेय. सिनेमातील गाणी, डायलॉग सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल झालेत. अनेक थिएटरमध्ये तिकीटं मिळणं मुश्किल झालंय. ऑनलाईनही तिकिटं बुक होत नाहीयेत.

तिकिटं मिळणं मुश्किल

आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागलेत. अनेक थिएटरमध्ये तिकीटं मिळणं मुश्किल झालंय. ऑनलाईनही तिकिटं बुक होत नाहीयेत.

सिनेमाची गोष्ट

हा सिनेमा गंगुबाई काठियावाडीच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात तो काळ दाखवण्यात आला आहे जेव्हा गंगुबाई कामाठीपुराची राणी होती. आजही कामाठीपुरात अनेक घरात गंगुबाईचा फोटो पहायला मिळतो. एकेठिकाणी तर गंगुबाईचा पुतळाही आहे. या गंगुबाईच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.

संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा म्हटलं की बिग बजेट भव्यदिव्य सेट… तसाच हा एक सिनेमा आहे. सिनेमात दाखवण्यात आलेला कामाठीपुरा भाग भव्य दाखवण्यात आला आहे. सिनेमात करीम लालाची दिमाखदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे.गंगुबाई काठियावाडी या सिनेमा अनेक कलाकार या एकाच सिनेमात पहायला मिळतात. पहिलं नाव म्हणजे अर्थात आलिया भट जिने गंगुबाई हे पात्र साकारलं आहे. दुसरं नाव म्हणजे अजय देवगण. त्याने करीम लालाचं पात्र साकारलं आहे. याशिवाय हुमा कुरेशी, शंतनू माहेश्वरी, विजय राझ असे अनेक कलाकार या सिनेमात तुम्हाला एकत्र पडद्यावर पहायला मिळतात.

संबंधित बातम्या

‘माझ्यातला अनिरुद्ध राक्षस जितका आतून बाहेर येईल तितकाच..’; मिलिंद गवळींची पोस्ट वाचली का?

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक; सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

Russia Ukraine Crisis: नको युद्ध, हवा बुद्ध; मराठी कलाकारांनी व्यक्त केली हळहळ

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.