Alia Bhatt Birthday : वयाच्या 11 व्या वर्षी आलिया पडली होती रणबीर कपूरच्या प्रेमात, आलियाची ‘बचपन का प्यार’वाली लव्हस्टोरी

आज लाखों तरूणांच्या 'दिल की धडकन' आलिया भटचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आलिया आणि रणबीर कपूर यांची लव्हस्टोरी जाणून घेऊयात...

Alia Bhatt Birthday : वयाच्या 11 व्या वर्षी आलिया पडली होती रणबीर कपूरच्या प्रेमात, आलियाची 'बचपन का प्यार'वाली लव्हस्टोरी
रणबीर कपूर, आलिया भट
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 9:54 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) हिचा आज तिचा वाढदिवस आहे. आलियाने बॉलिवूडला अनेक दर्जेदार सिनेमे दिले. नुकताच आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangunbai Kathiawadi) हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने तिला बॉलिवूडची ‘गंगुबाई’ अशी ओळख दिली. आलियाने वयाच्या सहाव्या वर्षी कामाला सुरूवात केली. ‘संघर्ष’ चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून कामाला सुरूवात केली. स्टुडंट ऑफ द इयरमधल्या तिच्या बबली भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. आज आलियाचा 29 वा वाढदिवस (Alia Bhatt Birthday) आहे. तिच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होतोय. यंदाचा तिचा वाढदिवसही खास आहे. कारण ‘गंगुबाई काठियावाडी’सारखा सुपरहिट सिनेमा बॉक्सऑफिस गाजवत असताना तिचा वाढदिवस साजरा होतोय. पण या सगळ्यात आलियचं पर्सनल आयुष्यही तितकंच चर्चेत आहे. आलिया आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की रणबीर हे आलियाचं बचपन का प्यार आहे. वयाच्या 11 व्या वर्षी आलिया रणबीरच्या प्रेमात पडली होती.

आलियाचं बचपन का प्यार

आलिया आणि रणबीर कपूर मागच्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच आलिया भट्ट आणि रणवीर कपूर लग्न करणार असल्याचीही माहिती आहे. आलियाने एका मुलाखती दरम्यान रणबीर आपल्याला लहानपणीपासून आवडत असल्याचं म्हटलं होतं. आलियाने ‘कॉफी विथ करण’कार्यक्रमात सांगितलं होतं की, “ती 11 वर्षांची असल्यापासून रणबीरवर तिचा क्रश आहे. आलियाने रणबीरला ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या सेटवर पाहिलं होतं. तेव्हा तो संजय लीला भन्साळींसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. तेव्हाच तो मला आवडला होता.”

आलियाचं करिअर

करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून कामाला सुरूवात केली. स्टुडंट ऑफ द इयरमधल्या तिच्या बबली भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं.त्यानंतर तिने इम्तियाज अलीच्या हायवे चित्रपटात काम केलं. टू स्टेट्स, हंप्टी शर्माच्या दुल्हनियाँ, कलंक, राझी, डिअर जिंदगी या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.

“काश्मीरी पंडितांवर अन्याय ही तर भाजपची चूक”, हिंदू महासंघाने भाजपला फटकारलं!

जिंदगी ना मिलेगी दोबारा म्हणणाऱ्या अभय देओलचा आज वाढदिवस, जाणून अभयचं ‘फिल्मी’ करिअर…

आलिया-रणबीरचा नवीन बंगला म्हणजे श्रीमंती थाट! तुम्हालाही वाटेल असं हवं आपलं घर

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.