“आमचं एकमेकांवर प्रेम, लवकरच लग्न करणार”,आलिया भटकडून रणबीर कपूरसोबतच्या नात्याची कबुली

आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याचंही बोललं जातंय. एका मुलाखतीदरम्यान आलियाने रिलेशनशीप आणि रणबीरवरच्या प्रेमाबाबत खुलासा केला आहे.

आमचं एकमेकांवर प्रेम, लवकरच लग्न करणार,आलिया भटकडून रणबीर कपूरसोबतच्या नात्याची कबुली
आलिया भट आणि रणबीर कपूर
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 10:01 AM

आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. लवकरच आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याचंही बोललं जातंय. यावर आलिया-रणबीर उघडपणे बोलले नव्हते. पण एका मुलाखतीदरम्यान आलियाने रिलेशनशीप आणि रणबीरवरच्या प्रेमाबाबत खुलासा केला आहे. “आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मला वाटतं की तो माझ्या आयुष्यात आलेला सर्वोत्तम व्यक्ती आहे. मी त्याचा खूप आदर करते. त्याच्याबद्दल माझ्या मनात खूप जास्त प्रेम आहे. त्याने मला खूप सपोर्ट केला आहे. त्याला मी ओळखते. माझं जितकं त्याच्यावर प्रेम आहे तसंच प्रेम त्याचंही आहे. मी त्याच्याबद्दल जितकं चांगली बोलली आहे मलाही आशा आहे की तोही माझ्याबद्दल तसंच बोलेन. मी कधी लग्न करणार आहे याबद्दल मी लवकरच सांगेन. पण मी जेव्हा लग्न करेन तेव्हा ते सगळ्यांना कळेल”, असं आलिया म्हणाली आहे.

आलिया काय म्हणााली?

‘बॉलिवूड बबल’च्या मुलाखती दरम्यान आलिया भटला लग्नाविषयी विचारण्यात आलं तेव्हा आलियाने लग्नासंदर्भात खुलासा केला. “आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मला वाटतं की तो माझ्या आयुष्यात आलेला सर्वोत्तम व्यक्ती आहे. मी त्याचा खूप आदर करते. त्याच्याबद्दल माझ्या मनात खूप जास्त प्रेम आहे. त्याने मला खूप सपोर्ट केला आहे. त्याला मी ओळखते. माझं जितकं त्याच्यावर प्रेम आहे तसंच प्रेम त्याचंही आहे. मी त्याच्याबद्दल जितकं चांगली बोलली आहे मलाही आशा आहे की तोही माझ्याबद्दल तसंच बोलेन. मी कधी लग्न करणार आहे याबद्दल मी लवकरच सांगेन. पण मी जेव्हा लग्न करेन तेव्हा ते सगळ्यांना कळेल”, असं आलिया म्हणाली आहे.

पुढे नात्याबद्दल आलिय बोलती झाली. “मला वाटतं की, मागच्या काही दिवसात अनेकांनी लग्न केलं.लोकांना वाटतं की आम्ही एकत्र चांगले दिसतो. आम्हीही लग्न केलं पाहिजे. पण मला वाटते की हे सगळं तुमच्या भावनांवर अवलंबून आहे. तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्हाला जेव्हा योग्य वाटतं तेव्हा तुम्ही लग्नाबाबत निर्णय घेतला पाहिजे.”

आलिया आणि रणबीरची केमेस्ट्री

आलिया आणि रणबीरच्या नात्याला 2017 मध्ये सुरुवात झाली आहे. अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचं नात फुललं आणि नंतर दोघे प्रेमात पडले. ते दोघे अनेकदा एकत्र व्हॅकेशन इन्जॉय करताना दिसतात. आलिया सोशल मीडियावर रणबीरसोबतचे फोटो शेअर करत असते.

संबंधित बातम्या

Tejasswi Prakash Photo : तेजस्वी प्रकाश झाली ‘पिंकगर्ल’, फोटो शेअर करत म्हणाली…

मधुबाला यांची मनाला मोहिनी घालणारी सुपरहिट टॉप 5 गाणी, ऐका एका क्लिकवर…

सौंदर्याची खाण, सुपरहिट गाण्यांचा सुपरहिट चेहरा, वाचा सुपरहिट मधुबाला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.