Neetu Kapoor | नीतू कपूर यांनी खरेदी केले मुंबईत कोट्यावधींचे घर, आलिया भट्ट हिच्यानंतर सासूबाईंची जोरदार खरेदी
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच चर्चेत असते. आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वीच मुंबईत मोठी खरेदी करत कोट्यावधींचा फ्लॅट हा आलिया भट्ट हिने खरेदी केला होता. आता आलिया भट्ट हिच्यानंतर नीतू कपूर यांनीही मोठी खरेदीही मुंबईत केली आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर हे दोघे कायमच चर्चेत असतात. आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, इतरांपेक्षा तिला बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी काही खास मेहनत नक्कीच लागली नाहीये. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी लग्न केले. लग्न (Marriage) करण्याच्या अगोदर तब्बल 5 वर्षांपासून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया एकमेकांना डेट करत होते. 6 नोव्हेंबरला आलिया भट्ट हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले असून राहाची एक झलक पाहण्यास चाहते आतुर आहेत. मात्र, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीची झलक ही अजूनही चाहत्यांना दाखवली नाही.
काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट हिने बांद्रा परिसरात 37 कोटींचा फ्लॅट घरेदी केला. त्यानंतर आलिया भट्ट हिने बहीण शाहीन हिला दोन 7.68 कोटींचे फ्लॅट गिफ्ट केले. आता आलिया भट्ट हिच्यानंतर नीतू कपूर यांनीही आलिशान फ्लॅटची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे नीतू कपूर यांनी खरेदी केलेला फ्लॅट अत्यंत आलिशान असून तगडी किंमत त्यांनी मोजली.
रिपोर्टनुसार नीतू कपूर यांनी बांद्रा येथील कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 17.4 कोटींची फ्लॅट खरेदी केला आहे. 4 बीएचके हा फ्लॅट असून अत्यंत आलिशान असल्याचे सांगितले जात आहे. रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंट्सनुसार 1.04 कोटींची स्टांप ड्यूटी भरून नीतू कपूर यांनूी 10 मेला प्लॅट आपल्या नावावर केला आहे. तीन पार्किंग या फ्लॅटला असल्याचे देखील सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच नीतू कपूर या जुग जुग जियो या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात अनिल कपूरही मुख्य भूमिकेत होते. जुग जुग जियो चित्रपटाच्या माध्यमातून नीतू कपूर यांनी अनेक वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. जुग जुग जियो चित्रपटात काम करण्यासाठी घरातील सर्व सदस्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिल्याचे देखील नीतू कपूर यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.
विशेष म्हणजे जुग जुग जियो चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना नीतू कपूर या दिसल्या होत्या. विशेष म्हणजे नीतू कपूर या सोशल मीडियावरही सक्रिय दिसत असून सतत त्या फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. नीतू कपूर याने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती, त्यानंतर त्या चर्चेत आल्या. ही पोस्ट कतरिना कैफ हिच्यासाठी असल्याची देखील चर्चा होती.