“म्हणून मी बॉलिवूडपासून 10 वर्ष लांब होते”, सुष्मिता सेनने सांगितलं कारण…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. तिच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. एकेकाळी बॉलिवूडला (Bollywood) एकाहून एक हिट सिनेमे देणारी सुष्मिता इतके दिवस बॉलिवूडपासून दूर का होती असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर तिने एका मुलाखती दरम्यान दिलं. जेव्हा सुष्मिताला ती मागची 10 वर्षे […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. तिच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. एकेकाळी बॉलिवूडला (Bollywood) एकाहून एक हिट सिनेमे देणारी सुष्मिता इतके दिवस बॉलिवूडपासून दूर का होती असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर तिने एका मुलाखती दरम्यान दिलं. जेव्हा सुष्मिताला ती मागची 10 वर्षे बॉलिवूडपासून दूर का होती असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने दिलेलं उत्तर सर्वांच पटलं. सुष्मिता म्हणाली की, “काही काळासाठी मी कामातून ब्रेक घेतला. पण नंतर मी जेव्हा पुन्हा काम कारण्याचा विचार केला तेव्हा मला तेवढ्या चांगल्या भूमिकांसाठी विचारलं जात नव्हतं. याचकाळ माझ्या मुली मोठ्या होत होत्या. त्यामुळे मग मी त्याच्या संगोपणाकडे लक्ष देण्याचं ठरवलं. त्यांच्या वाढीच्या काळात आई म्हणून मी त्यांच्यासोबत होते, याचा मला आनंद आहे.”
म्हणून बॉलिवूडपासून 10 वर्ष दूर होते- सुष्मिता
आपण बी-टाऊनपासून दूर का होतो, याचं उत्तर सुष्मिताने दिलं. “काही काळासाठी मी कामातून ब्रेक घेतला. पण नंतर मी जेव्हा पुन्हा काम कारण्याचा विचार केला तेव्हा मला तेवढ्या चांगल्या भूमिकांसाठी विचारलं जात नव्हतं. याचकाळ माझ्या मुली मोठ्या होत होत्या. त्यामुळे मग मी त्याच्या संगोपणाकडे लक्ष देण्याचं ठरवलं. त्यांच्या वाढीच्या काळात आई म्हणून मी त्यांच्यासोबत होते, याचा मला आनंद आहे”, असं सुष्मिता म्हणाली.
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘आर्या 2’ या सिरीजच्या माध्यामातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा एन्ट्री केली. तब्बल दहा वर्षानंतर ती या सिरीजच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
1994 साली सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. यावेळी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. तिने बिवी नंबर वन, चिंगारी, सिर्फ तुम, मै हूँ ना, दुल्हा मिल गया, दस्तक या सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
संबंधित बातम्या