Vidya Balan Net Worth | घर, गाड्या आणि पैसे, पाहा ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे ‘शेरनी’ विद्या बालन!

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) लाखों चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिच्या बिनधास्त अभिनयासाठी परिचित असलेली विद्या बालन नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट निवडते. अभिनेत्रीचे चित्रपटही चाहत्यांमध्ये चांगलेच पसंत केले जातात.

Vidya Balan Net Worth | घर, गाड्या आणि पैसे, पाहा ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे ‘शेरनी’ विद्या बालन!
विद्या बालन
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 8:46 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) लाखों चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिच्या बिनधास्त अभिनयासाठी परिचित असलेली विद्या बालन नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट निवडते. अभिनेत्रीचे चित्रपटही चाहत्यांमध्ये चांगलेच पसंत केले जातात. अभिनेत्रीचे चित्रपट कमाईच्या बाबतीतही खूप यशस्वी ठरतात. तसे, विद्या स्वत: एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन आकारते (Bollywood actress Vidya Balan total Net Worth).

विद्या बालनचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांची एकूण मालमत्ता अंदाजे 476 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 32 अब्ज रुपये) आहे. तर स्वत: विद्यादेखील कमाईच्या बाबतीत तिच्या पतीपेक्षा कमी नाही. विद्यानेही स्वत: देखील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता कमावली आहे.

विद्याची संपत्ती किती?

जर, आपण कुठल्याही सेलिब्रिटीच्या कमाईबद्दल विचार केला तर, तर त्यांची बरीच मिळकत ही त्यांच्या फॅन फॉलोईंगवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत विद्या बालन ही एक अशी अभिनेत्री आहे, जी भारत आणि इतर देशांमध्येही खूप प्रसिद्ध आहे. अभिनयाशिवाय विद्या चित्रपट निर्माती, स्टेज परफॉर्मर आणि रिअॅलिटी टीव्ही शो होस्ट देखील आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्रीने अनेक रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार विद्या बालनची एकूण संपत्ती 18 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 134 कोटी आहे. विद्याच्या कमाईचा मुख्य स्त्रोत ब्रँड एंडोर्समेंट्स आणि चित्रपटांमधून तयार झाला आहे. 2020 पर्यंत विद्या बालनची संपत्ती 27 दशलक्ष डॉलर्सवर आली आहे.

अभिनेत्रीच्या गाड्या

विद्याला महागड्या गाड्यांचीसुद्धा खूप आवड आहे. म्हणूनच, तिच्या ताफ्यात मर्सिडीज ई-क्लास आणि सेडानसारख्या लक्झरी कारचा समावेश आहे. या अभिनेत्रीकडे मर्सिडीज बेंझ ही गाडी देखील आहे.

विद्याची प्रॉपर्टी

अभिनेत्री विद्या बालन आपल्या कुटुंबियांसह चेंबूरमधील एका साध्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. मात्र, आता या अभिनेत्रीने मुंबई आणि खारमध्ये काही लक्झरी अपार्टमेंट्स खरेदी केल्या आहेत. तिच्या पतीने देखील 14 कोटी रुपयांचे अपार्टमेंट खरेदी केले आहे, जे त्याने अभिनेत्रीला भेट म्हणून दिले. अभिनेत्रीच्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटची किंमत 8 कोटी रुपये आहे. यासह, तिच्याकडे देशभरात अनेक भू-संपत्ती मालमत्ता देखील आहेत.

पद्मश्री विजेती विद्याने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. ‘हम पाच’ या प्रसिद्ध मालिकेत ती दिसली होती. बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. अभिनेत्रीने 14 डिसेंबर 2012 रोजी निर्माता सिद्धार्थ रॉय-कपूरसोबत लग्न केले. अभिनेत्रीच्या पतीच्या मालमत्ता तिच्या संपत्तीशी जोडली तर, अभिनेत्री अब्जावधींची मालकीण आहे.

(Bollywood actress Vidya Balan total Net Worth)

हेही वाचा :

Samantar 2 | दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य! काय घडणार कुमारच्या आयुष्यात? पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त टीझर

‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियमणी विद्या बालनची बहीण, एकमेकींच्या बाँडिंगबद्दल सांगताना म्हणाली…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.