A Thursday Trailer : यामी गौतमच्या ‘A Thursday’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट, दोन तासात एक मिलियनहून अधिक views

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या 'ए थर्स डे' या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. दोन तासात या ट्रेलला एक मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

A Thursday Trailer : यामी गौतमच्या 'A Thursday' चित्रपटाचा ट्रेलर आऊट, दोन तासात एक मिलियनहून अधिक views
यामी गौतम-'ए थर्स डे'
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 1:56 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या (Yami Gautam)ए थर्स डे(A Thursday) या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर आऊट झालाय. हा चित्रपट लवकरच डिझ्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. दोन तासात या ट्रेलरला साडे एक मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. हा ट्रेलर आवडल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. अभिनेत्री यामी गौतम या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स ड्रामा (suspense drama) आहे. हा चित्रपट येत्या 17 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. याविषयी यामीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पहावं लागेल.

‘ए थर्स डे’चा ट्रेलर रिलीज, सिनेरसिकांच्या प्रतिक्रिया

यामी गौतमच्या ‘ए थर्स डे’ या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. दोन तासात या ट्रेलरला एक मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. हा ट्रेलर आवडल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. हा ट्रेलर बघून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असल्याचं कुणी म्हटलंय. तर कुणी यामी गौतमची भूमिका आवडल्याचं म्हणतंय.

चित्रपटाची गोष्ट

बेहजाद खंबाटा यांनी ‘ए थर्स डे’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तसंच आरएसव्हीपी फिल्म्स यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा एक सस्पेन्स ड्रामा आहे. यामी गौतमने यात एका किडनॅपरची भूमिका केली आहे. नयना जैसस्वाल ही भूमिका यामीने साकारली आहे. पंतप्रधानांना भेटण्यासाठी ती लहान मुलांना वेठीस धरते, असं प्रथम दर्शनी या ट्रेलरमध्ये दिसत आहे.

यामीची इन्स्टाग्राम पोस्ट

यामी गौतमच्या ‘ए थर्स डे’ या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झालाय. हा ट्रेलर तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याला तिने तितकंच समर्पक कॅपशन दिलं आहे. ”हा’ गुरुवार सामान्य दिवस नसेल. एक सामान्य स्त्री संपूर्ण देशाचे भाग्य बदलेल.”, असं तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टला कॅपशन दिलं आहे.

‘ए थर्स डे’ हा सस्पेन्स ड्रामा 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिझ्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा पाहता येईल.

संबंधित बातम्या

Sayani Gupta : अभिनेत्री सयानी गुप्ताचा हटके अंदाज, ‘यलो’ लूकची सोशल मीडियावर चर्चा

Gangubai Kathiawadi Dholida : ‘गंगूबाई काठियावाडी’चं पहिलं गाणं रिलीज, ‘ढोलिडा’चा सोशल मीडियावर धुमाकूळ

LataDidi | लतादीदींच्या अस्थींचे नाशिकमधील रामकुंडात विसर्जन; रसिकांची तोबा गर्दी!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.