AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit Net Worth | बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण! जाणून घ्या नेटवर्थ किती…

मुंबईला स्वप्नांचे शहर असे म्हणतात, ज्यात बरेच लोक अभिनेता होण्याचे स्वप्न पाहतात. बॉलिवूडमध्ये येण्याचे अनेक लोकांचे स्वप्न सत्यात उतरते आणि ते आपली एक वेगळी ओळख बनवतात. त्यातील एक आहे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit).

Madhuri Dixit Net Worth | बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण! जाणून घ्या नेटवर्थ किती...
माधुरी दीक्षित
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 9:48 AM
Share

मुंबई : मुंबईला स्वप्नांचे शहर असे म्हणतात, ज्यात बरेच लोक अभिनेता होण्याचे स्वप्न पाहतात. बॉलिवूडमध्ये येण्याचे अनेक लोकांचे स्वप्न सत्यात उतरते आणि ते आपली एक वेगळी ओळख बनवतात. त्यातील एक आहे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). माधुरीने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती बॉलिवूडमध्ये तसेच परदेशातही तिच्या नृत्यासाठी ओळखली जाते.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने ‘अबोध’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘बेटा’, ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्यानंतर ती अनिल कपूरसोबत ‘तेजाब’ या चित्रपटात देखील दिसली होती. या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. तेव्हापासून माधुरी एक स्टार बनली.

कॅकनॉलेज डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार माधुरी दीक्षित ही 250 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. एक फिल्म करण्यासाठी ती तब्बल 4-5 कोटी रुपये घेते. त्याचबरोबर ती रिअॅलिटी शोच्या एका सीझनसाठी 24-25 कोटी शुल्क घेते. माधुरी दीक्षितने ब्रँड अ‍ॅन्डॉर्सेसमधून सर्वाधिक कमाई केली आहे. एका ब्रँडला मान्यता देण्यासाठी ती सुमारे 8 कोटी रुपये घेते. गेल्या तीन वर्षात माधुरीची संपत्ती 40 टक्क्यांनी वाढली आहे.

माधुरी दीक्षितचे घर

माधुरी दीक्षित मुंबईतील लोखंडवाला येथील लक्झरी घरात राहते. यासह माधुरीकडेही देशात इतर ठिकाणीही बरीच मालमत्ता आहे.

माधुरी दीक्षित कार कलेक्शन

माधुरी दीक्षितला लक्झरी वाहनांची आवड आहे. तिच्याकडे एक पांढरी ऑडी कर आहे. याशिवाय त्याच्याकडे टोयोटा इनोव्हा क्रिस्टल, रोल्स रॉयस आणि स्कोडा रॅपिड या गाड्या देखील आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, माधुरी दीक्षित शेवटच्या वेळी ‘कलंक’ या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हासोबत दिसली होती. हा मल्टीस्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. माधुरी दीक्षित सध्या छोट्या पडद्यावर दिसते आहे. ‘डान्स दिवाना 3’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोची ती जज करत आहे. शोमध्ये माधुरीला परीक्षकाच्या भूमिकेतही खूप पसंत केले जात आहे.

(Bollywood Dhakdhak Girl Actress Madhuri Dixit Net Worth)

हेही वाचा :

‘त्यांनी तर आम्हाला थेट प्रसूतिगृहातच पाठवले!’, ‘गुडन्यूज’च्या चर्चेवर आदित्य नारायणची प्रतिक्रिया

Mukesh Birth Anniversary : ‘क्या खूब लगती हो’पासून ते ‘मैं पल दो पल का शायर हूं’पर्यंत, ऐका मुकेश यांची सदाबहार गाणी!

Zimmad : झिम-झिम झिम्माड धारांनी…, रिफ्रेशिंग अनुभव देणारा अमृता नातूचा नवा म्युझिक व्हिडीओ!

काजोलची बहीण असूनही इंडस्ट्रीत नाही कमावता आले नाव, पहा आता काय करतेय तनिषा मुखर्जी…

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.