Sanjay Leela Bhansali | अखेर संजय लीला भन्साळी यांनी व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाले लोक मला गंगूबाई काठियावाडी

प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर हवा केली. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी खूप जास्त मेहनत घेतली होती.

Sanjay Leela Bhansali | अखेर संजय लीला भन्साळी यांनी व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाले लोक मला गंगूबाई काठियावाडी
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 9:57 PM

मुंबई : चाहते गेल्या काही दिवसांपासून संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या हिरामंडीची प्रतिक्षा करत आहेत. शेवटी शनिवारी त्यांच्या या वेब सीरिजचा फर्स्ट लूक समोर आला. यामध्ये ऋचा चढ्ढा, सोनाक्षी सिन्हा अदिती राव हैदरी, मनीषा कोईराला यांची झलक बघायला मिळत आहे. संजय लीला भन्साळी यांचे प्रत्येक चित्रपट (Movie) काहीतरी वेगळ्या आणि हटके स्टोरीवर आधारित असतात. फर्स्ट लुक लॉन्च वेळी संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये अभिनेत्री अलिया भट्ट ही महत्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटामध्ये आलियाचा एक वेगळा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची जवळपास सर्व शूटिंग ही मुंबईमध्ये करण्यात आली होती. हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर संजय लीला भन्साळी यांच्या समस्यांमध्येही मोठी वाढ झाली होती. अनेकांनी हा चित्रपट रिलीज होऊ नये, याकरिता प्रयत्न देखील केले होते. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर हवा केली. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी खूप जास्त मेहनत घेतली होती.

आता चित्रपट रिलीज होऊन इतके दिवस झाले असता, संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. संजय लीला भन्साळी म्हणाले की, अनेकांनी मला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता.

थेट काहीजण म्हणाले होते की, हा चित्रपट अजिबात तू तयार करू नकोस. ते म्हणत होते की गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट महिला केंद्रित आहे. का तुला भारतामध्ये महिलांवरील चित्रपटासाठी दुसरा कोणताही विषय मिळाली नाहीये का? इतकेच नाही तर पुढे संजय लीला भन्साळी म्हणाले की, लोकांनी मला थेट म्हटले की, अशा प्रकारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरत नाहीत.

कारण या चित्रपटाची स्टोरी ही सेक्स वर्करवर आधारित आहे आणि यामध्ये एखादा अभिनेता देखील नाहीये. तरीही गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान कामगिरी केली. मला या माझ्या चित्रपटावर पूर्ण विश्वास होता. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट कोरोनाच्या काळात रिलीज झाला होता.

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळाले. मात्र, कोरोनाचा थोडाफार फटका चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर झाला. या चित्रपटाला सुरूवातीपासून मोठा विरोध होताना दिसत होता. अनेकांनी या चित्रपटामधील आलिया भट्ट हिच्या भूमिकेचे काैतुक केले होते.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.