AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किंगखानचा मुलगा आर्यन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार, पण अभिनय करणार नाही; मग काय करणार?

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झालाय. पण तो आपल्या वडीलांसारखं अॅक्टिंग करणार नाही तर त्याला लिखाणाची आवड आहे.

किंगखानचा मुलगा आर्यन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार, पण अभिनय करणार नाही; मग काय करणार?
शाहरूख खान, आर्यन खान
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 1:46 PM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Arayan Khan) बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झालाय. पण तो आपल्या वडीलांसारखं अॅक्टिंग करणार नाही तर त्याला लिखाणाची आवड आहे. त्यामुळे तो चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून काम करणार नाही तर तो चित्रपटाची कथा लिहिणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी त्याच्या मनात असणाऱ्या कल्पनांवर तो सध्या काम करत असल्याची माहिती आहे. तो सध्या फिचर फिल्म्स आणि वेब सीरिजमध्ये काम करणार असल्याची माहिती आहे. तो अॅमेझॉन (Amazon) प्राइमच्या वेब सीरिज आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या चित्रपटांसाठी काम करणार असल्याची माहिती आहे. आर्यन सध्या बिलाल सिद्दीकीसोबत (Bilal Siddiki) स्क्रिप्टवर काम करत आहे तो सध्या त्याच्या काही कल्पनांवर काम करत आहे.

आर्यन खान बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झालाय. पण तो आपल्या वडीलांसारखं अॅक्टिंग करणार नाही तर त्याला लिखाणाची आवड आहे. त्यामुळे तो चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून काम करणार नाही तर तो चित्रपटाची कथा लिहिणार असल्याची माहिती आहे.

आर्यन अॅमेझॉन प्राइमच्या वेब सीरिज आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या चित्रपटासाठी काम करू शकतो, अशी माहिती आहे.अॅमेझॉन प्राइमवरची ही सीरिज एका चाहत्याच्या जीवनावर आधारित असेल. याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.आर्यन बिलाल सिद्दीकीसोबत स्क्रिप्टवर काम करत आहे. याआधी शाहरुखने अनेकवेळा सांगितले आहे की, त्याला लिखाणाची आवड आहे आणि विशेष म्हणजे आर्यनला आता या क्षेत्रात काम करायचे आहे.

दरम्यान, आर्यनला जरी अभिनयात रस नसला तरी शाहरुखची मुलगी सुहाना खान अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्यास उत्सुक आहे. सुहानाने न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे धडे गिरवतेय. तिने काही शॉर्टफिल्म आणि नाटकांमध्येही काम केल आहे. सुहाना झोया अख्तर यांच्या आगामी प्रोजेक्टमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचीही चर्चा आहे.

संबंधित बातम्या

नेटकऱ्याने विचारला भलताच प्रश्न विचारला, समंथाचं 6 शब्दात उत्तर, म्हणाली…

उमेश-मुक्ताची ‘अजूनही बरसात आहे’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

मी ‘ते’ सगळं मिस करतोय, प्रशांत दामलेंनी सांगितली ‘व्यथा’

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.