Shamshera | शमशेरा चित्रपट फ्लॉप, 6 व्या दिवशी फक्त 2.30 कोटींचे कलेक्शन, करण मल्होत्रा यांची भावनिक पोस्ट…
वृत्तानुसार, 'शमशेरा'ने सहाव्या दिवशी 2.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 39.75 कोटींवर पोहोचले आहे. हे आकडे अतिशय निराशाजनकच आहेत. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस 'शमशेरा' ची कमाई 40 कोटी रुपये होईल, असा विश्वास आहे. अजूनही शमशेराची 65-75 कोटी रुपयांपर्यंत कमाई जाण्याची अपेक्षा आहे.
मुंबई : रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘शमशेरा’ चित्रपटाची मोठी चर्चा होती. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करेल अशी अपेक्षा देखील होती. मात्र, हा चित्रपट फ्लॉप ठरलायं. ‘शमशेरा’कडून बॉक्स ऑफिसवर (Box office) जबरदस्त कामगिरीची अपेक्षा या चित्रपटाशी संबंधित चाहते आणि स्टार्सना होती. ‘शमशेरा’ची कमाई आठवडाभरात खूपच कमी राहिली आहे. शमशेराने (Shamshera) रिलीजच्या पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली. या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन 10.25 कोटी रुपये होते. चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 31 कोटी रुपयांची कमाई केली.
शमशेराची सहाव्या दिवशी 2.30 कोटी रुपयांची कमाई
वृत्तानुसार, ‘शमशेरा’ने सहाव्या दिवशी 2.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 39.75 कोटींवर पोहोचले आहे. हे आकडे अतिशय निराशाजनकच आहेत. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस ‘शमशेरा’ ची कमाई 40 कोटी रुपये होईल, असा विश्वास आहे. अजूनही शमशेराची 65-75 कोटी रुपयांपर्यंत कमाई जाण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, 40 कोटींचा आकडा पार करणे देखील चित्रपटाला अवघड झाले आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी मोठे बजेट होते हा चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 150 कोटी खर्च करण्यात आले आहेत. शमशेरा चित्रपटाचे दिग्दर्शक करण मल्होत्रा यांची एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीयं.
रणबीरसोबत करण मल्होत्राचे पुनरागमनही फ्लॉप
शमशेरा हा चित्रपट करण मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केला असून त्यांचा सात वर्षांतील पहिला चित्रपट आहे. रणबीरसोबत करण मल्होत्राचे पुनरागमनही फ्लॉप ठरले. या चित्रपटात संजय दत्त, रोनित रॉय, सौरभ शुक्ला आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. रणबीर कपूरच्या उर्वरित प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर तो लवकरच पत्नी आलिया भट्टसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. अयान मुखर्जीच्या या फँटसी चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.