The Kapil Sharma Show | ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्याचे कारण सांगून चंदन प्रभाकरने सर्वांना केले हैराण…

द कपिल शर्मा शोमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच कलाकरांनी शोला राम राम ठोकल्या. यामुळे एक वेगळीच चर्चा बाहेर सुरू आहे. या सीजनमध्ये शोचा भाग चंदन प्रभाकर नसल्याच्या काही दिवसांपूर्वी बातम्या होत्या.

The Kapil Sharma Show | 'द कपिल शर्मा शो' सोडण्याचे कारण सांगून चंदन प्रभाकरने सर्वांना केले हैराण...
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 12:32 PM

मुंबई : कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) आता परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. गेल्या अनेक महिन्यांपासून कपिल शर्मा शोचे चाहते शोची आतुरतेने वाट पाहात होते. गेल्या आठवड्यापासून शो सुरू झाल्याने प्रेक्षकांमध्ये (Audience) उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय. यावेळी शोमध्ये अनेक नवीन कलाकार आले असून जुने काही चेहरे यंदाच्या सीजनमध्ये दिसत नाहीयंत. इतकेच नाही तर जुने चेहरे शोमध्ये दिसत नसल्याचे अनेक चर्चांना उधाण आले. द कपिल शर्मा शोमध्ये चंदू उर्फ चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) दिसणार नसल्याच्या काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या.

चंदन प्रभारकरबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम

द कपिल शर्मा शोमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच कलाकरांनी शोला राम राम ठोकल्या. यामुळे एक वेगळीच चर्चा बाहेर सुरू आहेत. या सीजनमध्ये चंदन प्रभाकर नसल्याच्या काही दिवसांपूर्वी बातम्या होत्या. मात्र, पहिल्या भागामध्ये चंदन प्रभाकर दिसल्याने प्रेक्षकांना मोठा धक्काच बसलाय. खरोखरच चंदन प्रभाकरने कपिल शर्मा शो सोडला की नाही हा प्रश्न अनेकांना पडलाय. इतकेच नाही तर एका मुलाखतीमध्ये चंदन प्रभाकरने शो सोडण्याचे  मोठे कारण सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

शो सोडण्याचे मोठे कारण चंदन प्रभाकरने बोलून दाखवले

‘ई-टाइम्स’शी बोलताना चंदन प्रभाकरने सांगितले की, मी गेल्या पाच वर्षांपासून या शोचा महत्वपूर्ण भाग होतो. माझ्यामध्ये आणि कपिल शर्मामध्ये कोणताच वाद झालेला नाहीये. मी फक्त वेळेमुळे थोडा ब्रेक घेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो करतो आहे. यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही. मला माझ्या कुटुंबाला चांगला वेळ द्यायचा आहे. यामुळे मी थोडीशी विश्रांती घेत आहे. इतर काही महत्वाच्या गोष्टींवर मला लक्ष द्यायचे आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.