Chhorii | शूटिंगच्या आधीपासूनच प्रेग्नंट बॉडी सूट घालण्यास सुरुवात, नुसरत भरुचाने ‘छोरी’ चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी अशी केली तयारी!

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा 'छोरी' (Chhorii) चित्रपटातून प्रेक्षकांना एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तिला एका पूर्णपणे नवीन अवतारात गर्भवती महिलेची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

Chhorii | शूटिंगच्या आधीपासूनच प्रेग्नंट बॉडी सूट घालण्यास सुरुवात, नुसरत भरुचाने 'छोरी' चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी अशी केली तयारी!
Chhorii
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 3:29 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा ‘छोरी’ (Chhorii) चित्रपटातून प्रेक्षकांना एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तिला एका पूर्णपणे नवीन अवतारात गर्भवती महिलेची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. या व्यक्तिरेखेच्या सरावासाठी शूटिंगच्या खूप आधीपासूनच नुसरतने प्रेग्नंट बॉडी सूट घालायला सुरुवात केली होती.

‘छोरी’ या हॉरर चित्रपटात गर्भवती स्त्रीच्या भूमिकेत दिसणार्‍या नुसरतने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी 25 दिवस आधी प्रेग्नंट बॉडी सूट घालण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीने गर्भवती महिलेच्या पात्रात पूर्णपणे उतरण्याचा आणि सेटवर आपले सर्वोत्तम देण्यासाठी हा निर्णय घेतला होता.

बॉडी सूटची सवयच झाली!

आपल्या या निर्णयावर विचार मांडताना नुसरत म्हणाली, ‘मी खऱ्या आयुष्यात इतक्या लवकर गरोदर होणार नाही, म्हणून मी एक बॉडीसूट बनवला, जेणेकरून गर्भवती असणाऱ्या स्त्रिया कोणत्या परिस्थितीतून जातात हे मला कळेल. मी 20-25 दिवस आधीपासून तो परिधान करायला सुरुवात केली होती. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आणि खाणे, झोपणे, बाथरूममध्ये जाणे, फिरणे आणि त्यात येणारी बंधने समजून घेणे, ही सर्व कामे मी प्रामाणिकपणे केली. गरोदरपणाशी संबंधित सर्व गोष्टी स्वतः समजून घेण्यासाठी आणि नंतर त्यांना अधिक वास्तववादी पैलूंसह अभिनयात उतरवण्यासाठी, ज्याच्याशी प्रेक्षकांना जोडता येईल, यासाठी मला स्वतःला पूर्णपणे यात गुंतवून घ्यावे लागले. हा माझ्यासाठी प्रॉप नसला तरी माझा एक भाग होता, पण मला याची इतकी सवय झाली होती की, जेव्हा शूट सुरू होते, तेव्हा मला रिहर्सल दरम्यान आराम करताना बॉडी सूटमध्ये अधिक आरामदायक वाटत होते.’

बॉडी सूट कॅरी करणे कठीण!

गर्भधारणेच्या आधुनिक पैलूबद्दल आपले विचार शेअर करताना नुसरत म्हणाली, ‘आम्ही एक अतिशय वास्तववादी सिनेमा करत असल्याने, सर्व काही प्रेक्षकांना स्पून फीड करण्याची गरज नाही. प्रेक्षकांना टिपिकल पद्धतीने न सांगता की तुम्ही खरोखर गर्भवती आहात, त्यांना यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार करणे महत्त्वाचे होते. झोपताना किंवा बाथरूमला जाताना किंवा मिड-स्क्वाट्स करताना बॉडी सूटशी जुळवून घेणं थोडं कठीण असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्त्रीची गर्भधारणा वेगळी असते आणि कधी कधी बॉडी सूट आपल्यासोबत सतत कॅरी करणे कठीण असतं.’

नुसरतची ‘लपाछपी’

नुसरतला ‘साक्षी’च्या भूमिकेत पाहण्यासाठी आणि शहरातून एका निर्जन खेडेपर्यंतचा तिचा प्रवास अनुभवण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत, जिथे तिला पारलौकिक गोष्टींचा अनुभव येतो. नुसरतच्या या पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवताराद्वारे तिच्या अभिनयाचा एक वेगळा आयाम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, जो प्रेक्षकांना निश्चितच त्यांच्या खुर्च्यांवर खिळवून ठेवेल. विशाल फुरिया दिग्दर्शित आणि टी-सीरीज़, क्रिप्ट टीवी आणि अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, छोरी 26 नोव्हेंबर 2021 रोजी जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा  :

Marathi Movie | सुयश टिळक-मिताली मयेकरची ‘हॅशटॅग प्रेम’कथा, नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

चिमुकली अवनी करणार ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चं सूत्रसंचालन, वडील देखील सुप्रसिद्ध गायक!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.