Cinema Censorship | फरहान अख्तर, अनुराग कश्यपसह 1400 कलाकार सेन्सॉरशिप कायद्याच्या विरोधात, दाखल केली याचिका!
चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या नियमात सध्या काही नवे बदल होणार आहेत. मात्र, संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री या बदलांच्या विरोधात आहे. खरं तर, ज्या नवीन नियमांबद्दल बोलले जात आहे, त्यानुसार सेन्सॉर प्रमाणपत्रानंतर आधीच रिलीज झालेल्या चित्रपटाविरोधात काही तक्रारी आल्या असतील, तर सेन्सॉर पुन्हा त्यात लक्ष घालू शकणार आहे.
मुंबई : चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या नियमात सध्या काही नवे बदल होणार आहेत. मात्र, संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री या बदलांच्या विरोधात आहे. खरं तर, ज्या नवीन नियमांबद्दल बोलले जात आहे, त्यानुसार सेन्सॉर प्रमाणपत्रानंतर आधीच रिलीज झालेल्या चित्रपटाविरोधात काही तक्रारी आल्या असतील, तर सेन्सॉर पुन्हा त्यात लक्ष घालू शकणार आहे. मात्र, या नव्या नियमा विरोधात अनेक निर्मात्यांनी याचिका दाखल केली आहे (Cinema Censorship Actor Farhan Akhtar and Anurag Kashyap Oppose this new rules).
वास्तविक, सरकारने 2 जुलैपर्यंत सिनेमॅटोग्राफ विधेयक 2021च्या मसुद्यावर सूचना मागितल्या होत्या. तथापि, काही निर्मात्यांनी यासंदर्भात सरकारकडे अधिक वेळ मागितला आहे. दैनिक भास्कर यांच्या अहवालानुसार, विवेक अग्निहोत्री म्हणतात की, सरकारने जर सूचना मागितल्या असतील तर आपण त्या दिल्या पाहिजेत. कायदा करण्यापूर्वी सरकार आमचे मत विचारात घेत आहे, ही चांगली गोष्ट आहे.
त्याचबरोबर सुधीर मिश्रा म्हणतात की, सध्या कोरोनाच्या साथीमुळे अवघे मनोरंजन विश्व आधीच त्रस्त आहे आणि आता हा नवा नियमही समोर आला आहे.
केवळ बॉलिवूडच नाही तर दक्षिण इंडस्ट्रीतील सेलेब्सही याला विरोध करत आहेत. या बदलाबद्दल दक्षिण चित्रपट अभिनेता कमल हासन म्हणाले की, आम्ही तीन माकडांसारखे डोळे, तोंड आणि कान बंद करून राहू शकत नाही.
बड्या प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही!
यासंदर्भात अनेक बड्या प्रॉडक्शन हाऊसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इंडस्ट्रीमधील प्रत्येकजण त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे.
फरहान-अनुराग यांनीही केला निषेध
मात्र, बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अनुराग कश्यप यांनीही इतर अनेक निर्मात्यांसह या विरोधात ऑनलाईन याचिका दाखल केल्या आहेत.
‘तूफान’मुळे फरहान चर्चेत
गेल्या काही काळापासून फरहान अख्तरचा ‘तूफान’ (Toofan) हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटात फरहान अख्तर (Farhan Akhtar) याने बॉक्सर अजीज अलीची भूमिका साकारली आहे. ‘तूफान’ हा चित्रपट Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर तो चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ‘तूफान’ आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फरहान अख्तरने यापूर्वी मिल्खा सिंह यांचा बायोपिक ‘भाग मिल्खा भाग’ मध्ये काम केले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. नेहमीप्रमाणेच त्याची या भूमिकेसाठीची कठोर मेहनत ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे.
(Cinema Censorship Actor Farhan Akhtar and Anurag Kashyap Oppose this new rules)
हेही वाचा :
ED चा बॉलिवूडकडे मोर्चा, नववधू अभिनेत्री यामी गौतमला समन्स, पुढील आठवड्यात झाडाझडती