Aryan Khan Drugs Case | कोकेनचे आश्वासन, 80 हजारांचा गांजा!, आर्यन-अनन्याच्या चॅटमधून नवा खुलासा

आर्यन खान (Aryan Khan Drugs case) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नवा खुलासा झाला आहे. या चॅटमध्ये एनसीबीच्या नावाने आर्यनने मित्रांना धमकावलं आहे. एका चॅटमध्ये आर्यनने 'उद्या कोकेन' देण्याचे वचन दिले आहे.

Aryan Khan Drugs Case | कोकेनचे आश्वासन, 80 हजारांचा गांजा!, आर्यन-अनन्याच्या चॅटमधून नवा खुलासा
Aryan-Ananya
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 12:20 PM

मुंबई : आर्यन खान (Aryan Khan Drugs case) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नवा खुलासा झाला आहे. या चॅटमध्ये एनसीबीच्या नावाने आर्यनने मित्रांना धमकावलं आहे. एका चॅटमध्ये आर्यनने ‘उद्या कोकेन’ देण्याचे वचन दिले आहे. दुसर्‍या चॅटमध्ये आर्यन खानने 80,000 रुपये किमतीचा गांजा अचित कुमार नावाच्या अमली पदार्थ तस्कराकडून विकत घेतल्याचा उल्लेख केला आहे.

एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन-अनन्या संभाषणाव्यतिरिक्त आर्यनच्या मित्रांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे, जो फक्त ड्रग्सबद्दल बोलण्यासाठी तयार करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये आणखी अनेक स्टार किड्सचा समावेश आहे. एजन्सी लवकरच या ग्रुपतील इतर लोकांना चौकशीसाठी कॉल करू शकते.

अनन्या-आर्यन आणि ड्रग ग्रुपमध्ये नेमकं काय चाललं होतं?

पहिले संभाषण, तारीख- 06/07/2019

या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्या आणि आर्यन ड्रग्जबद्दल बोलत आहेत. आर्यन यात लिहितो, मग अनन्या तिची मागणी सांगिते. मग आर्यन म्हणतो, मी तुझ्याकडून गुपचूप घेईन आणि अनन्यानेही यावर होकार दिला. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, प्रथमदर्शनी अनन्या ही आर्यन खानला अल्प प्रमाणात पुरवठादार असल्याचे दिसते.

आर्यन – वीड

अनन्या – इट्स इन डिमांड

आर्यन – मी तुझ्याकडून गुपचूप घेईन.

अनन्या – ठीक आहे

दुसरे संभाषण – 06/07/2019

हे त्याच दिवशीचे संभाषण आहे जिथे अनन्या आर्यनला लिहिते, ‘आता मी बिझनेसमध्ये आहे’ याचा अर्थ असा आहे की, आता तिच्याकडे ड्रग्ज उपलब्ध आहेत. यानंतर आर्यनने विचारले की, तू गांजा विकत घेतलास का?? जेव्हा अनन्या उत्तर देत नाही, तेव्हा आर्यन पुन्हा ‘अनन्या’ लिहितो आणि त्यानंतर तिने उत्तर दिले, मला ते लवकरच मिळेल.

अनन्या – आता मी बिझनेसमध्ये आहे

आर्यन – तू गांजा घेतलास?

आर्यन- अनन्या?

अनन्या – मला लवकर मिळेल.

तिसरे संभाषण, तारीख – 18/04/2021

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ही चॅट आर्यन खानचा एक कथित व्हॉट्सअॅप ड्रग ग्रुपची आहे, जिथे आर्यन त्याच्या दोन मित्रांना ‘चला कोकेन करू’ म्हणजेच कोकेनचा नशा करण्यास सांगत आहे. यानंतर तो म्हणतो की, आय एम गेटिंग यू फक्ड बाय एनसीबी’ आणि एजन्सीची खिल्लीही उडवतो. आर्यनची ड्रग्ज गँग या गटातील ड्रग्जबाबत खुलेआम बोलत आहे.

आर्यन – उद्या कोकेन घेऊ.

आर्यन – I am getting you guys fucked.

आर्यन – By NCB

आणखी तीन सेलिब्रिटी किड्सची चौकशी होऊ शकते!

व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आर्यन खान मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदी करण्याबाबत अचित कुमारशी बोलत आहे. आर्यन खानने अचित कुमारकडून 80 हजार रुपयांचे ड्रग्ज मागवले होते. आर्यन खानच्या फोनमधून जप्त करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप डेटामध्ये ड्रग्जच्या संदर्भात इतर दोन लोकांसोबत ग्रुप चॅटही दाखवण्यात आले आहे. अनन्या पांडे व्यतिरिक्त, एनसीबीकडे आर्यन खानच्या इतर तीन सेलिब्रिटी किड्ससोबत झालेल्या चॅटची माहिती आहे.

हेही वाचा :

Birthday Special : मोहसीन खान-शिवांगी जोशीच्या केमिस्ट्रीने लाखो चाहत्यांना लावलं वेड, पाहा फोटो

Aryan Khan Case LIVE | आर्यन खानच्या जामीन अर्जावर बॉम्बे हायकोर्टात सुनावणी होणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.