Ram Setu | राम सेतू चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलासा, वाचा संपूर्ण प्रकरण
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपच चर्चेत आहे. चाहते देखील राम सेतू चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मुंबई : गेले काही दिवस बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीसाठी अजिबात चांगले ठरले नाहीत. बॉलिवूड उद्योग कोरोनाच्या काळापासून करोडोंचे नुकसान सहन करत आहे. त्यामध्येच आता आमिर खान (Aamir Khan) आणि अक्षय कुमारसारख्या फेमस अभिनेत्यांचे चित्रपट देखील बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल करू शकत नाहीयेत. यासर्व गोष्टींमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. राम सेतू या चित्रपटाबद्दल (Movie) एक महत्वाची माहिती पुढे येतंय.
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपट चर्चेत आहे. चाहते देखील राम सेतू चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. उच्च न्यायालयाकडून राम सेतू चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाने 23 वेबसाइटवर राम सेतूचे वितरण, स्ट्रीमिंग, डाउनलोड आणि होस्टिंगवर बंदी घातली आहे.
माहितीनुसार, 23 वेबसाइट्सची यादी तयार करण्यात आली आहे. या संकेतस्थळांवरून राम सेतू डाउनलोड करता येणार नाहीये. यासोबतच न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचे भाष्य देखील केले आहे. चित्रपट रिलीज झाल्यावर काही साईटवर चित्रपट बघायला मिळत असल्याने चित्रपट निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
कोर्टाने म्हटले आहे की, निर्माते चित्रपट बनवण्यासाठी आणि प्रमोशन करण्यासाठी करोडो रुपये खर्च करतात. चित्रपट निर्मात्यांच्या परवानगीशिवाय चित्रपट अशाप्रकारे प्रदर्शित करणे अत्यंत चुकीचे आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 20 फेब्रुवारीला होणार आहे. न्यायालयाने तब्बल 23 वेबसाइट्सवर बंदी घातली आहे.