Cannes 2022: झगमगत्या दुनियेतील सर्वांत प्रतिष्ठित ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या परीक्षकपदी दीपिका पदुकोणची निवड

75व्या 'कान फिल्म फेस्टिव्हल'च्या (Cannes Film Festival 2022) परीक्षकपदी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) निवड झाली आहे. मंगळवारी रात्री या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकांची नावं जाहीर करण्यात आली होती.

Cannes 2022: झगमगत्या दुनियेतील सर्वांत प्रतिष्ठित 'कान फिल्म फेस्टिव्हल'च्या परीक्षकपदी दीपिका पदुकोणची निवड
Deepika PadukoneImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 9:34 AM

75व्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या (Cannes Film Festival 2022) परीक्षकपदी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) निवड झाली आहे. मंगळवारी रात्री या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकांची नावं जाहीर करण्यात आली होती. यामध्ये दीपिकाचाही समावेश आहे. 2017 मध्ये दीपिकाने या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर पाच वर्षांत आता तिने परीक्षकाचा मान मिळवला आहे. इतर परीक्षकांसोबतचा फोटो पोस्ट करत दीपिकाने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. यामध्ये तिच्यासोबत ऑस्कर विजेते असगर फरहादी, जेफ निकोलस, रेबेका हॉल, नूमी रापेस, जास्मिन ट्रिंका, लेडी ली आणि जोशीम ट्रायर या परीक्षकांचा समावेश आहे. कान फिल्म फेस्टिव्हलला इतर सर्व फिल्म फेस्टिव्हल्सचा राजा मानलं जातं. रेड कार्पेट (Red Carpet) हा या फेस्टिव्हलमधील सर्वांत दिमाखदार सोहळा असतो.

येत्या 17 मे पासून यंदाचा कान फिल्म फेस्टिव्हल सुरू होणार आहे आणि 28 मे रोजीच्या गाला सेरेमनीमध्ये परीक्षक विजेत्यांची नावं जाहीर करणार आहेत. यंदाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेव्हिड क्रोनेनबर्ग यांच्या ‘क्राइम्स ऑफ द फ्युचर’ हा चित्रपट स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत आहे. यामध्ये लिया सेडक्स, क्रिस्टन स्टेवर्ट आणि विगो मॉर्टेन्सन यांच्या भूमिका आहेत. दक्षिण कोरियाच्या ‘डिसिजन टू लिव्ह’ या गूढ थरारपटाचाही त्यात समावेश आहे.

आजवर कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, मल्लिका शेरावत, सोनम कपूर, दीपिका पदुकोण या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. नवनवे फॅशन, झगमगीत पोशाख आणि सर्वांत हटके स्टाइल हे या रेड कार्पेटवरील कलाकारांच्या लूक्सचं वैशिष्ट्य असतं. जगभरातील चित्रपटक्षेत्रातील हा एक विलक्षण आणि तितकाच अलौकिक असा मेळा असतो.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.