Disha Patani: दिशा पटानीचे वडील राजकारणात ठेवणार पाऊल? निवडणूक लढवण्याची शक्यता

जगदीश सिंह पटानी लढवणार 'ही' निवडणूक?

Disha Patani: दिशा पटानीचे वडील राजकारणात ठेवणार पाऊल? निवडणूक लढवण्याची शक्यता
Disha PataniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 1:53 PM

मुंबई- अभिनेत्री दिशा पटानीने (Disha Patani) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. अभिनयाव्यतिरिक्त दिशा मॉडेलिंगमुळे जास्त चर्चेत असते. आता दिशाचे वडील जगदीश सिंह पटानी (Jagdish Singh Patani) हे लवकरच राजकारणात पाऊल ठेवणार असल्याचं कळतंय. जगदीश सिंह पटानी यांनी राजकारणात (Politics) प्रवेश करण्याची पूर्ण तयारी केली आहे. ते आधी उत्तरप्रदेश पोलीस विभागात कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ते बरेली शहराच्या महापौरपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही काळापासून ते बरेली शहरात कार्यरत आहेत.

जगदीश सिंह यांच्या नावाचे होर्डिंग्स जेव्हा बरेली शहरात लागले, तेव्हापासून ते निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांना काही राजकीय पक्षांकडून उमेदवारीची तिकिट मिळाल्याचं दिशाच्या वडिलांनी सांगितलं. मात्र जगदीश सिंह पटानी यांनी अद्याप आपला निर्णय जाहीर केला नाही. ते इतर पर्यायांचाही विचार करत आहेत.

हे सुद्धा वाचा

दिशाने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिची भूमिका छोटीच होती, पण त्यालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. नुकतीच ती ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात झळकली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. ‘योद्धा’ आणि ‘प्रोजेक्ट के’ हे तिचे चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.