Mahadev App : बड्या प्रॉडक्शन हाऊसवर ईडीची छापेमारी; महादेव बेटिंग ॲपमुळे बॉलिवूडमध्ये ‘तांडव’

महादेव बेटिंग ॲपप्रकरणाचा तपास ईडीने सुरू केल्यामुळे अख्खं बॉलिवूड ढवळून निघालं आहे. या प्रकरणी बड्या कलाकारांना समन्स बजावण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. हे प्रकरण ताजं असतानाच ईडीने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे.

Mahadev App : बड्या प्रॉडक्शन हाऊसवर ईडीची छापेमारी; महादेव बेटिंग ॲपमुळे बॉलिवूडमध्ये 'तांडव'
ed raidImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 3:31 PM

मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : महादेव बेटिंग ॲपप्रकरणी (Mahadev Betting Scam) ईडीने अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) , श्रद्धा कपूर, कपिल शर्मासहीत अनेक बॉलिवूडच्या कलाकारांना समन्स बजावलं आहे. काही कलाकार अजूनही ईडीच्या रडारवर आहे. या सेलिब्रिटींची चौकशी होणार असल्याने बॉलिवूडमध्ये (Bollywood) एकच खळबळ उडालेली असतानाच आता बॉलिवूडकरांची झोप उडवून देणारी बातमी समोर आली आहे. ईडीने मुंबईतील कुरैशी प्रॉडक्शन हाऊसवर छापेमारी केली आहे. या कुरैशी प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका राजकीय पक्षाशी संबंधित वसीम कुरैशी यांचं हे प्रॉडक्शन हाऊस असल्याचं सांगितलं जात आहे.

कुरेशी प्रॉडक्शन हाऊस हे बॉलिवूडमधील मोठं प्रोडक्शन हाऊस आहे. या प्रॉडक्शन हाऊसच्या मुंबईतील कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. महेश मांजरेकर यांच्या आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातही कुरेशी प्रॉडक्शन हाऊसची महत्वाची भूमिका आहे. अनेक दिग्गज बॉलिवूड आणि राजकीय नेत्यांसोबत कुरेशी यांचे संबंध असून त्यांच्यासोबतचे त्यांचे फोटोही आहेत. त्यामुळे अचानक या प्रॉडक्शन हाऊसवर धाड मारण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

417 कोटींची संपत्ती जप्त

महादेव बेटिंग ॲपप्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ईडीने यापूर्वी या प्रकरणात रणबीर कपूरला समन्स बजावलं होतं. त्यानंतर हुमा कुरैशी, हिना खान, कपिल शर्मा आणि श्रद्धा कपूरलाही समन्स बजावलं आहे. आता तर थेट प्रॉडक्शन हाऊसवरच रेड मारल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून 417 कोटींची संपत्ती जप्त केली होती.

5 हजार कोटींचा भ्रष्टाचार

ईडीने महादेव बेटिंग प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या तपासात एकूण 5 हजार कोटींची भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं आहे. हे ॲप चालवणारे सौरभ चंद्राकर यांच्यावर अनेक कलाकारांना हवाला मार्फत पैसे दिल्याचा आरोप आहे. या कलाकारांनी या सट्टेबाजीला उत्तेजन देणाऱ्या ऑनलाईन ॲपचा प्रचार केला होता. आता याच प्रकरणात मिळालेल्या पेमेंटबाबत ईडी या कलाकारांची चौकशी करत आहे.

अनेक कलाकार ईडीच्या रडारवर

सौरभ चंद्राकरने फेब्रुवारी 2023मध्ये लग्न केलं होतं. त्याचं लग्न दुबईत झालं होतं. या लग्न सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी त्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना बोलावलं होतं. सोबत पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम यांनाही बोलावलं होतं. दरम्यान, येणाऱ्या काळात ईडी आणखी काही कलाकारांना समन्स बजावू शकते असं सांगितलं जात आहे. कृष्णा अभिषेक, पुलकित सम्राट, भारती सिंह, सनी लिओनीसही अनेक स्टार्स ईडीच्या रडावर आहे.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.