Budget 2021 | निर्मला सीतारमण यांच्या पेटाऱ्यात मनोरंजन जगतासाठी काय?
कोरोनामुळे फिल्म इंडस्ट्रीला खूप त्रास सहन करावा लागला आहे. बर्याच मोठ्या बजेटचे चित्रपट रिलीजची वाट गेल्या काही दिवसांपासून बघत आहेत त्यामुळे चित्रपट निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे
मुंबई : कोरोनामुळे फिल्म इंडस्ट्रीला (film industry) खूप त्रास सहन करावा लागला आहे. बर्याच मोठ्या बजेटचे चित्रपट रिलीजची वाट गेल्या काही दिवसांपासून बघत आहेत त्यामुळे चित्रपट निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर चित्रपटगृहाचे मालकही दिवाळखोरीत आले आहेत. अशा परिस्थितीत फिल्म इंडस्ट्रीला आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. जीएसटी आणि बजेटमध्ये करमणूक कर कमी करण्याची मागणी केली जात आहे. (Expectations from Budget 2021 to the film industry)
जेव्हा चित्रपटाची तिकिटे महाग होतात. तेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहांकडे फिरत नाहीत. काही दिवसांपूर्वी चित्रपटसृष्टीतील प्रतिनिधींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचीही भेट घेतली होती. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत होते. 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू होते. यामुळे बिग बजेटचे चित्रपट रिलीज केले जात नव्हते त्यापैकीच सूर्यवंशी हा चित्रपट होता. बॉलिवूडमध्ये अनेक निर्माते चित्रपटगृहे 100 टक्यांने सुरू होण्याची वाट गेल्या अनेक दिवसांपासून पाहात होते.
आता 50 टक्क्यांनी चित्रपटगृहे सुरू झाल्यामुळे बॉलिवूडमधील एकापेक्षा एक बिग बजेटचे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट देखील आहे. अयान मुखर्जी यांनी हा दिग्दर्शित केला आहे. 2018 पासून सुरू असलेल्या या चित्रपटाचे बजेट तब्बल 300 कोटींच्या घरात गेले आहे.
संबंधित बातम्या :
प्रेक्षकांसाठी मोठी बातमी, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार, केंद्राची मोठी घोषणा!
IMDB Rating : पाहा आयएमडीबी रेटिंगमध्ये कोणत्या वेबसीरिजचा जलवा
शाहरुख-दीपिकापेक्षा मोठा झाला झाला जॉन अब्राहम? पठानच्या शूटिंगसाठी तारीखच देईना…!
(Expectations from Budget 2021 to the film industry)