अमिताभ बच्चन यांना स्टारडम मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध लेखकाचा मृत्यू; बिग बी, अनिल कपूर गहिवरले

बॉलिवूडसाठी मोठी आणि दु:खदायक बातमी आहे. प्रसिद्ध संवाद लेखक आणि पटकथा लेखक प्रयागराज यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर दु:खाचा डोंगरच कोसळला असून अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अमिताभ बच्चन यांना स्टारडम मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध लेखकाचा मृत्यू; बिग बी, अनिल कपूर गहिवरले
Prayagraj Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 6:56 AM

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : महानायक अमिताभ बच्चन यांचं स्टारडम कायम राखणाऱ्या सिनेमांच्या प्रसिद्ध लेखकाचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध स्क्रीनरायटर प्रयागराज यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षाचे होते. शनिवारी वांद्रे येथील निवासस्थानी प्रयागराज यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे चिरंजीव आदित्य यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिली. प्रयागराज यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. प्रयागराज यांच्या निधनावर बिग बी अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

आदित्य यांनी प्रयागराज यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. वडील प्रयागराज यांनी वांद्रे येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही आजार झाले होते. पण त्यांची प्रकृती स्थिर होती. गेल्या 10 वर्षापासून त्यांना हृदयाशी संबंधित आजार होता. त्यावर उपचारही सुरू होते. पण हा आजार पूर्णपणे बरा झाला नव्हता, असं आदित्य यांनी सांगितलं. प्रयागराज यांनी वयाच्या 88 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक एवढेच लोक उपस्थित होते.

अमिताभ बच्चन यांचं स्टारडम राखलं

अमिताभ बच्चन जेव्हा यशाच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांचं स्टारडम राखण्याचं काम ज्या ज्या सिनेमांनी केलं. त्यातील काही सिनेमे प्रयागराज यांच्या लेखणीतून उतरले होते. अमर अकबर अँथोनी, गिरफ्तार, नसीब, कुली, परवरिश (1977), सुहाग (1979), नसीब (1981), कुली (1983), मर्द (1985), गंगा जमुना सरस्वती (1988) आणि अजूबा (1991) आदी सिनेमांचं पटकथा लेखन त्यांनी केलं होतं. या सिनेमांमुळे अमिताभ बच्चन यांचं स्टारडम कायम राखलंच शिवाय अमिताभ यांना यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं होतं.

तसेच त्यांनी हिफाजत या सिनेमाचंही लेखन केलं होतं. या सिनेमात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी काम केलं होतं. तर राजेश खन्ना यांच्या रोटी आणि धर्मेंद्र- जितेंद्र अभिनित धरमवीर सिनेमाची पटकथाही त्यांनी लिहिली होती.

त्यांनी फुल बने अंगारे या सिनेमाचे संवाद लिहून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर झुक गया आसमान (1968), भाई हो तो ऐसा (1972), रोटी (1974), आणि धरम करम (1975) सिनेमाचे संवाद लिहिली होते.

अमिताभ यांना दु:ख

प्रयागराज यांच्या निधनावर अमिताभ बच्चन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं आहे. कालच्या संध्याकाळी आपण या महान इंडस्ट्रीतील आणखी एक मजबूत आधार स्तंभ गमावला आहे, असं अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणत प्रयगराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अनिल कपूर यांना शोक अनावर

अभिनेते अनिल कपूर यांनी ही प्रयागराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. प्रयागराज यांच्या निधनावर मी प्रचंड दु:खी आहे. त्यांच्यासोबत हिफाजत सिनेमात काम करण्याचं भाग्य मिळालं. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असं अनिल कपूर यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.