Karan Johar | फराह खान हिने करण जोहरच्या कपड्यांची उडवली खिल्ली
अनेकदा करणला त्याच्या कपडयांवरून देखील ट्रोल केले जाते.
मुंबई : करण जोहर नेहमीच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मुलांना बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करत असल्याने करणवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. करण त्याच्या हटके कपड्यांसाठी देखील ओळखला जातो. अनेकदा करणला त्याच्या कपडयांवरून देखील ट्रोल केले जाते. मात्र, यावेळी करणच्या कपड्यांची खिल्ली चक्क फराह खान हिने उडवली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हिडीओच्या सुरूवातीला करण जोहर फराह खान जवळ येतो आणि म्हटतो की, मस्त…तू तर या खुर्च्यांच्या कापडाचा ड्रेस घातला आहे…हे म्हणून पुढे करण जोर जोरात हसताना दिसतो. फराह खान देखील मग करणचा चांगलाच समाचार घेते.
फराह खान करण जोहरला म्हणते की, तू काय कपडे घालतो..नेहमीच सोफाच्या कपड्याचे जॅंकेट शिवतो आणि घालतोस ना…फराह खानचे हे बोलणे ऐकल्यानंतर करण जोहर शांत बसताना दिसतो. हा एक मजेदार व्हिडीओ आहे.
View this post on Instagram
आता करण जोहर आणि फराह खान यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडला असून चाहते या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.
करण जोहर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. करण जोहर सैफ अली खानच्या मुलीला लवकरच लाॅन्च करणार असून यांचा हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विशेष म्हणजे करण जोहरच्या या चित्रपटात इब्राहिम अली खान महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात काजोल देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. आता इब्राहिमचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.