Father’s Day 2021 : ‘फादर्स डे’ निमित्त हीना खानची भावनिक पोस्ट, म्हणाली हे फोटो तुम्हाला दाखवले नाही कारण…

बॉलिवूड अभिनेत्री हीना खान फादर्स डे निमित्तानं भावनिक झाली आहे. तिनं सोशल मीडियावर वडिलांसोबतचे काही फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन दिलं आहे. (Father's Day 2021: Actress Hina Khan's emotional post on the occasion of 'Father's Day')

Father’s Day 2021 : ‘फादर्स डे’ निमित्त हीना खानची भावनिक पोस्ट, म्हणाली हे फोटो तुम्हाला दाखवले नाही कारण…
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 10:52 AM

मुंबई : आज प्रत्येकजण फादर्स डे (Father’s Day) साजरा करत आहे. या निमित्तानं प्रत्येकजण आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर काही खास पोस्ट शेअर करत आहेत. तर दुसरीकडे, बॉलिवूड अभिनेत्री हीना खान (Hina Khan) या निमित्तानं प्रचंड भावनिक झाली आहे. या ‘फादर्स डे’ला तिचे वडील तिच्यासोबत नसणार हे हीनाला माहित नव्हतं. वडिलांची आठवण म्हणून हीनानं त्याच्यासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

बाबा हे फोटो तुम्ही पाहायला हवे होते…

हे फोटो शेअर करत हीनाने लिहिलं की, ’20 जून, बाब तुम्हाला निघून जायला 2 महिने झालेत. आपण 7 महिन्यांपूर्वी हे फोटो क्लिक केले होते आणि मी हे फोटो तुम्हाला दाखवले नाहीत कारण मला हे मला खास दिवशी शेअर करायचे होते. मी आज हे फोटो शेअर करेन असा विचार केला नव्हता. बाबा हे फोटो तुम्ही पाहायला हवे होते. आपण हेच डिझाइन केलेलं ना??? मिस यू. हॅपी फादर्स डे डॅडी. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.’

पाहा पोस्ट (See Post)

View this post on Instagram

A post shared by HK (@realhinakhan)

वडिलांच्या मृत्यूवेळी हीना होती श्रीनगरमध्ये 

हीनाच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्रिटींनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हीनासाठी प्रत्येकानं प्रेम दाखवलं आहे. जरी प्रत्येकाचं प्रेम हीनावर असलं तरी तिच्या वडिलांची आठवण आणि प्रेम कोणीही पूर्ण करू शकत नाही. वडिलांच्या निधनानंतर हीना खूपच तुटली होती. वडिलांचं निधन झालं आणि ती बातमी समजताच ती तातडीनं मुंबईला परत आली. यादरम्यान तिचं श्रीनगरमध्ये शूट सुरु होतं.

वडिलांच्या मृत्यूनंतर कोरोनाचं संक्रमण

यानंतर हीना कोरोना पॉझिटिव्ह होती. हीनानं पुन्हा स्वत:ची काळजी घेतली आणि कामावर आली. तिनं सांगितलं होतं की ती आपल्या वडिलांची स्ट्राँग मुलगी आहे. हीना ज्या शूटिंगसाठी श्रीनगरला गेली होती त्या गाण्याचं काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलं आहे. गाण्याचं नाव ‘बारिश बन जाना आहे’. या गाण्यात शाहीर शेख हीनासोबत दिसला आहे. गाण्यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

संबंधित बातम्या

Photo : क्रिती सेनॉनचा क्लासी लूक, ब्लॅक आऊटफिटमध्ये हटके फोटो शेअर

Photo : श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचा सोशल मीडियावर जलवा, नवनवीन फोटोशूट शेअर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.