Father’s Day 2021 : यंदाच्या ‘फादर्स डे’ निमित्ताने बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहा!

दरवर्षी 20 जून रोजी ‘फादर्स डे’ (Fathers Day 2021) रोजी साजरा केला जातो. बॉलिवूडमध्येही वडील आणि मुलांच्या नात्यावर असे बरेच चित्रपट तयार केले गेले आहेत, जे यंदाच्या ‘फादर्स डे’निमित्ताने आपण आपल्या वडिलांसोबत पाहू शकतात आणि त्याच्याबरोबरचे आपले नाते आणखी मजबूत बनवू शकतात.

Father’s Day 2021 : यंदाच्या ‘फादर्स डे’ निमित्ताने बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहा!
‘फादर्स डे’ स्पेशल चित्रपट
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 4:25 PM

मुंबई : दरवर्षी 20 जून रोजी ‘फादर्स डे’ (Fathers Day 2021) रोजी साजरा केला जातो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीही वडिलांचे स्थान घेऊ शकत नाही. वडिलांचे आपल्या मुलांवर खूप प्रेम असते, पण ते कधीच व्यक्त करू शकत नाही. मुलांच्या गरजा भागवण्यासाठी ‘बाप’ स्वतःच्या गरजा कमी करतात. बॉलिवूडमध्येही वडील आणि मुलांच्या नात्यावर असे बरेच चित्रपट तयार केले गेले आहेत, जे यंदाच्या ‘फादर्स डे’निमित्ताने आपण आपल्या वडिलांसोबत पाहू शकतात आणि त्याच्याबरोबरचे आपले नाते आणखी मजबूत बनवू शकतात. चला तर जाणून घेऊया या चित्रपटांबद्दल….(Fathers Day 2021 special Bollywood movie you can watch with your father)

पीकू

पीकूची कथा एका मुक्त आणि सशक्त मनाच्या आणि नोकरी करणाऱ्या आणि सतत वडिलांच्या तब्येतीच्या काळजीत असलेल्या मुलीभोवती फिरते. या चित्रपट असे दाखवले आहे की, वडिलांना नेहमीच आपल्या मुलीला आपल्या जवळ ठेवायचे असते. त्याच वेळी, त्यांची मुलगी वडिलांची काळजी घेण्याची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते. या दरम्यान ती खूप अस्वस्थ देखील असते. परंतु, तरीही ती नेहमी तिच्या वडिलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. या चित्रपटात पीकूची व्यक्तिरेखा दीपिका पदुकोणने साकारली आहे आणि तिचे वडील अमिताभ बच्चन यांनी साकारले आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता.

फॅमिली मॅन 2

प्रत्येकजण त्यांचे काम करत आपले व्यायसायिक जीवन आणि कुटुंब यांच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. ‘द फॅमिली मॅन 2’च्या दुसर्‍या सीझनमध्येही कुटुंबावर लक्ष केंद्रित केले गेले. मग ते वडील आणि त्यांचा मुलगा यांच्यामधील निर्दोष संभाषण असो किंवा वयात येणाऱ्या मुलीच्या वाढत्या नखऱ्यांनी हैराण झालेल्या वडिलांची दुर्दशा असो. एखादा एजंट आपली देशासंदर्भातील जबाबदारी सांभाळत असताना एक वडिल असण्याची भूमिका कशी निभावतो, हे यात दाखवले आहे.

राजमा चावल

बॉलिवूडच्या एका चित्रपटाचे नाव ‘राजमा चावल’ असे ठेवण्यात आले, कारण हा पदार्थ प्रत्येक भारतीयांच्या घरात लोकप्रिय आहे. ‘राजमा चावल’ हा 2018 चा बॉलिवूड ड्रामा असून, त्यात दोन पिढीतील दरी दाखवली गेली आहे. चित्रपटाची कहाणी आजच्या आणि जुन्या पिढीमधील जनरेशन गॅप दाखवते.

अपने

या चित्रपटात धर्मेंद्र हे माजी बॉक्सर दाखवले गेले आहेत, ज्यांच्यावर डोपिंगचा आरोप लावण्यात आलेला असतो. त्यांना आपल्या मुलाद्वारे आपले स्वप्न पूर्ण करायचे असते. सुरुवातीला त्यांचा मुलगा बॉक्सिंग करण्यास नकार देतो. तथापि, नंतर त्याला त्याच्या वडिलांचा आदर आणि सन्मान परत मिळावायची इच्छा जागृत होते आणि त्याचा विचार बदलतो.

उडान

या चित्रपटात असे दाखवले गेले आहे की, मुलांसह जास्त काटेकोरपणामुळे वागल्यामुळे काय होते. त्यांना अधिक शिस्तबद्ध बनवण्यासाठी टाकलेले एक पाऊल, त्यांची वाढ कशी थांबवते, ते दाखवले आहे. आपण हा चित्रपट आपल्या पालकांसह पाहू शकता.

दंगल

फोगट बहिणींवर आधारित या चित्रपटात केवळ कुस्तीपटूंच्या कथा दाखवली गेले नाही, तर त्यामध्ये वडिलांचे त्यांच्या मुलींशी असलेले नातेही दाखवले गेले आहे. सुरुवातीला दोन्ही बहिणींनी वडिलांचा द्वेष करतात कारण, त्यांना त्यांच्या आयुष्याची मजा घेऊ दिली नाही. परंतु, नंतर त्यांना समजते की यामागे वडिलांचा हेतू उदात्त आहे.

(Fathers Day 2021 special Bollywood movie you can watch with your father)

हेही वाचा :

Bigg Boss 15 | कलाकारांच्या आधी सामान्यांना घरात प्रवेश, ‘बिग बॉस 15’मध्ये येणार मोठा ट्विस्ट

Photo : नॉन-फिल्मी स्टाईलमध्ये गौतमनं केलं होतं काजलला प्रपोज, काजल म्हणाली तो बिलकूल फिल्मी नाही…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.