AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yami Gautam : लग्नानंतर यामी गौतमचा पहिला फोटो आला समोर, या लूकमध्ये दिसली प्रचंड सुंदर

यामीचं बाकीच्या सेलिब्रिटींप्रमाणे लग्न झालं नाही तर तिच्या कुटुंबातील आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हिमाचलमधील तिच्या घरी अगदी साध्या पद्धतीनं लग्न झालं. (first photo of Yami Gautam after marriage, this look looks hugely beautiful)

Yami Gautam : लग्नानंतर यामी गौतमचा पहिला फोटो आला समोर, या लूकमध्ये दिसली प्रचंड सुंदर
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 11:12 AM
Share

मुंबई: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) नुकतंच दिग्दर्शक आदित्य धरसोबत (Aditya Dhar) विवाह बंधनात अडकली आहे. यामीनं स्वतः लग्नाची घोषणा करणारे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.आता लग्नानंतर यामीचा पहिला फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ती नवीन वधूच्या रूपात दिसत आहे. हिरव्या रंगाची साडी, सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या परिधान केलेली यामी खूप सुंदर दिसत आहे.

‘तुझ्या सहवासात प्रेम करायला शिकले’

आदित्यबरोबर फोटो शेअर करताना यामीनं लिहिलं की, ‘मी तुझ्या सहवासात प्रेम करायला शिकले.’ यामीनं लग्नात लाल रंगाची साडी परिधान केली होती. त्यासोबतच आदित्यनं ऑफ-व्हाइट शेरवानी परिधान केली होती. दोघंही एकत्र खूप सुंदर दिसत होते.

पाहा फोटो

यामीचा हा फोटो तिच्या लग्नासाठी आलेल्या कॅटरर्स आणि डेकोरेटर गितेश शर्मा यांनी शेअर केला आहे. यामी आणि आदित्य या दोघांसोबत त्यानं एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साध्या पद्धतीनं लग्न

यामीचं बाकीच्या सेलिब्रिटींप्रमाणे लग्न झालं नाही तर तिच्या कुटुंबातील आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हिमाचलमधील तिच्या घरी अगदी साध्या पद्धतीनं लग्न झालं. तिच्या लग्नाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर, यामीनं लग्नात पहाडी वधूचा लूक कॅरी केला होता.

View this post on Instagram

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

मेहंदीमध्ये यामीनं गडद पिवळ्या रंगाचा शेड सूट परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. या सोहळ्यात आदित्यही यामीबरोबर होता.

लग्नाची कोणालाही खबर नाही

यामी आणि आदित्यनं आपलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. दोघांनाही एकमेकांवर प्रेम आहे हे कुणालाही कळू दिलं नाही. आदित्य उरी चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक आहे. या चित्रपटात यामी गौतम आणि विक्की कौशल मुख्य भूमिकेत होते. उरीच्या माध्यमातूनच आदित्यनं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. परंतु या चित्रपटाच्या नंतर या दोघांची लव्ह स्टोरी कधी व कशी सुरू झाली याबद्दल कोणालाही माहिती नाही.

यामी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही आणि यामुळेच यमी आणि आदित्यच्या लग्नामुळे केवळ चाहतेच नव्हे तर सेलेब्रिटींनाही धक्का बसला.

संबंधित बातम्या

Photo : जॅकलिन पेक्षाही हॉट आहे तिची ड्युप्लिकेट, चालवते स्वत:चं यूट्यूब चॅनल

युवराजसोबत दीपिका पदुकोणच्या नात्याची चर्चा, ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनी दिली होती ‘ही’ कारणे!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.