Today Release Films | शुक्रवार ठरणार मनोरंजनाचा वार! रणवीरच्या ‘83’पासून ते साराच्या ‘अतरंगी रे’पर्यंत अनेक चित्रपट-सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला!

शुक्रवारी (24 डिसेंबर) अनेक चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होत आहेत. यावेळी तुमचा वीकेंड खूप धमाकेदार असणार आहे. एकीकडे ‘83’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत, तर दुसरीकडे सारा अली खानचा 'अतरंगी रे' OTT वर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Today Release Films | शुक्रवार ठरणार मनोरंजनाचा वार! रणवीरच्या ‘83’पासून ते साराच्या ‘अतरंगी रे’पर्यंत अनेक चित्रपट-सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला!
83 to Atrangi Re
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 10:32 AM

मुंबई : शुक्रवारी (24 डिसेंबर) अनेक चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होत आहेत. यावेळी तुमचा वीकेंड खूप धमाकेदार असणार आहे. एकीकडे ‘83’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत, तर दुसरीकडे सारा अली खानचा ‘अतरंगी रे’ OTT वर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. यासोबतच आज साऊथचे अनेक चित्रपटही चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. या ख्रिसमसमध्ये तुम्हाला मनोरंजनाचा मोठा डोस मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणते चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होत आहेत…

83

अभिनेता रणवीर सिंहचा ’83’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 1983च्या वर्ल्ड कपवर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंह भारतीय क्रिकेटर आणि माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत दीपिका पदुकोण देखील आहे. या चित्रपटाबद्दल निर्मात्यांना प्रचंड उत्सुकता आहे. ‘83’चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. त्याचबरोबर दिल्ली सरकारने हा चित्रपट करमुक्त केला आहे.

अतरंगी रे

‘अतरंगी रे’बद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात सारा अली खान, अक्षय कुमार, धनुष हे त्रिकूट दिसणार आहे. ‘अतरंगी रे’चे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. हा चित्रपट आज OTT प्लॅटफॉर्म डिस्ने हॉट स्टारवर प्रदर्शित होणार आहे. सुपरस्टार धनुष 8 वर्षांनंतर ‘अतरंगी रे’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. यापूर्वी हा अभिनेता सोनम कपूरसोबत ‘रांझना’मध्ये दिसला होता.

श्यामा सिंघा रॉय

श्यामा सिंघा राय हा एक तेलुगु ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सुपरस्टार नानी आणि सई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुनर्जन्माच्या कथेवर आधारित आहे. यातील संगीत मिकी जे.मेयर यांनी दिले आहे. 2020 मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि आज 24 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

एजंट

‘एजंट’ हा तेलुगु स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले असून, वक्कंथम वामसी यांनी लिहिले आहे. या चित्रपटात अखिल अक्किनेनी, मामूट्टी आणि साक्षी वैद्य यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आज हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

गनी

गनी हा करण कोरापती लिखित आणि दिग्दर्शित तेलगू भाषेतील स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. रेनेसान्स पिक्चर्स आणि अल्लू बॉबी कंपनीच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटात वरुण तेज, सई मांजरेकर, जगपती बाबू, उपेंद्र, सुनील शेट्टी या कलाकारांचा समावेश आहे.

टॉनिक

‘टॉनिक’ हा बंगाली चित्रपट आहे. कोरोनामुळे चित्रपटाची रिलीज डेट बऱ्याच दिवसांपासून पुढे ढकलली जात होती. आज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा एका निवृत्त माणसाची आहे, ज्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो. यात वडील आणि मुलाचे नाते दाखवण्यात आले आहे.

कुंजेलधो

‘कुंजेलधो’ हा मल्याळम कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशा परिस्थितीत चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

रायडर

दाक्षिणात्य अभिनेता निखिल कुमारस्वामीच्या चाहत्यांसाठी हा ख्रिसमस खूप खास असणार आहे. अभिनेत्याचा अॅक्शन ड्रामा चित्रपट ‘रायडर’ आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार कोंडा यांनी केले आहे. निखिलने 2016 मध्ये ‘जग्वार’मधून करिअरला सुरुवात केली होती.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी’चं शेवटचं एलिमिनेशन, खुन्नस गेली, गट-तट संपले, निरोपाला सहाही जण ढसाढसा रडले

Happy Birthday Anil Kapoor | एकेकाळी गॅरेजमध्ये राहून काढले दिवस, आता जगाच्या कानाकोपऱ्यातील आलिशान बंगल्यांचा मालक अनिल कपूर!  

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.