शाहरुख खानपासून ते रणबीर कपूरपर्यंत, ‘या’ बॉलिवूडकरांसाठी समीर वानखेडे ठरलेयत ‘दबंग’ अधिकारी!

समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या खूप चर्चेत आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी कमालीचा कडकपणा दाखवत कुणापुढे न झुकण्याचा निर्णय घेतला आहे. पण आर्यन हा एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी नाही ज्याच्यावर समीर वानखेडे यांनी कारवाई केली आहे.

शाहरुख खानपासून ते रणबीर कपूरपर्यंत, ‘या’ बॉलिवूडकरांसाठी समीर वानखेडे ठरलेयत ‘दबंग’ अधिकारी!
समीर वानखेडे, एनसीबी अधिकारी
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 9:49 AM

मुंबई :मीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या खूप चर्चेत आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी कमालीचा कडकपणा दाखवत कुणापुढे न झुकण्याचा निर्णय घेतला आहे. पण आर्यन हा एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी नाही ज्याच्यावर समीर वानखेडे यांनी कारवाई केली आहे. याआधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी समीर यांच्या रडारावर आले आहेत. इतकंच नाही तर समीर वानखेडे बॉलिवूडमध्ये आधीच प्रसिद्ध आहे. वास्तविक, वानखेडे हे एनसीबीआधी विमानतळ कस्टम विभाग, सेवाकर विभागात होते. यादरम्यान त्यांचा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत आमनासामना झाला आहे. या कलाकारांची तासनतास चौकशी करून त्यांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी समीर ओळखले जातात. समीरनी अशा बॉलिवूड सेलिब्रिटींना मोठा दंडही ठोठावला आहे.

शाहरुख खान

आर्यन खानचे वडील शाहरुख खान याचा आधीही समीर वानखेडेंशी सामना झाला आहे. 2011 मध्ये शाहरुख खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वानखेडे यांनी विमानतळावर थांबवले होते. हॉलंड आणि लंडनमधून सुट्टी साजरी करून शाहरुख मुंबईला परतला होता. शाहरुखची बॅग तपासल्यानंतर वानखेडे यांनी 1.50 लाखांचा दंड ठोठावला होता.

अनुष्का शर्मा

2011 मध्ये समीर वानखेडे यांनी मुंबई विमानतळावर अनुष्का शर्माचे सामानही तपासले होते. अनुष्काकडे डायमंड ब्रेसलेटसह एक नेकलेस, कानातले आणि दोन महागडी घड्याळे सापडली होती. या घड्याळांची किंमत 35 लाख रुपये होती. 11 तासांच्या चौकशीनंतर अनुष्का शर्माला विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

रणबीर कपूर

2013 मध्ये रणबीर कपूरला विमानतळावर 40 मिनिटे थांबवण्यात आले होते. वानखेडे यांच्या टीमने सामानाची तपासणी केली असता रणबीरकडून अघोषित महागडे परफ्यूम, कपडे आणि बूट सापडले. त्यानंतर त्याच्यावर 60 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

कतरिना कैफ

2012 मध्ये जेव्हा कतरिना मुंबई विमानतळावर पोहोचली तेव्हा, ती कोणतेही सामान न घेता बाहेर आली होती. यानंतर तिचे दोन सहाय्यक तिचे सामान घेण्यासाठी विमानतळावर परत गेले. जिथे वानखेडे यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. कतरिनाच्या सामानात एक आयपॅड, 30 हजार रुपये रोख आणि व्हिस्कीच्या 2 बाटल्या सापडल्या. तिला परकीय चलन नियमन कायद्यांतर्गत 12,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बिपाशा बसू

लंडनहून परतल्यानंतर बिपाशा बसूला वानखेडे यांच्या टीमने मुंबई विमानतळावर थांबवले होते. बिपाशा बसूने तिच्या 60 लाखांच्या मौल्यवान वस्तूंची माहिती दिली नाही. त्यानंतर तिला 12 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

अनुराग कश्यप

2013 मध्ये समीर वानखेडे हे सेवाकर विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर कर गुंतवणुकीच्या अयोग्य माहितीमुळे अनुराग कश्यपला 55 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. नंतर त्याचे खातेही सील करण्यात आले होते.

हेही वाचा :

Mi Honar Superstar : ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमाचा दिवाळी विशेष भाग, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या कलाकारांसोबत होणार धमाकेदार सेलिब्रेशन

संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग, ‘ओव्यांच्या खजिन्या’ने दिवाळी होणार चैतन्यदायी!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.