Brahmastra चं नाव ऐकताच का भडकला रणबीर? व्हिडीओतून व्यक्त केला राग

"मी बाबा होणार आहे"; अयानवर संतापला रणबीर; पहा Video

Brahmastra चं नाव ऐकताच का भडकला रणबीर? व्हिडीओतून व्यक्त केला राग
Brahmastra चं नाव ऐकताच का भडकला रणबीर? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 7:38 PM

मुंबई- सोशल मीडियावर सध्या रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये तो ब्रह्मास्त्रच्या (Brahmastra) प्रमोशनचं नाव ऐकताच भडकलेला पहायला दिसतोय. नेमकं रणबीरला काय झालंय? स्वत:च्याच चित्रपटाच्या प्रमोशनविरोधात का रागावलाय? या व्हिडीओत रणबीर इतका चिडलाय की तो स्वत:चं डोकंदेखील आपटून घेतोय. दिग्दर्शक अयान मुखर्जीवर तो राग काढताना दिसतोय. केसरियाँ हे गाणं गाऊन आणि शिवा-शिवा ओरडून आलियाचाही (Alia Bhatt) घसा बसलाय, असंही तो म्हणतोय.

रणबीर कपूरच्या या व्हिडीओला खुद्द आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. ‘हार्ड फॅक्ट्स’ असं कॅप्शन देत आलियाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. रणबीर या व्हिडीओत जे काही म्हणतोय, त्या तथ्य असल्याचं तिचं म्हणणं आहे. रणबीर आणि आलिया हे ब्रह्मास्त्रचं प्रमोशन करून थकले आहेत. पण या व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय आहे?

हे सुद्धा वाचा

ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या 4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचसाठी रणबीरने हा व्हिडीओ शूट केला आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधी रणबीर-आलियाने ब्रह्मास्त्रचं जोरदार प्रमोशन केलं होतं. त्यामुळे आता ओटीटीसाठी काय प्रमोशन करायचं, असा प्रश्न रणबीर विचारतोय.

‘डान्स करून करून मी स्वत: भूत बनलोय, आलियाचा घसा बसलाय, 150 ड्रोन्स उडवले गेले, 250 टन लाडू वाटले गेले, आता अजून काय करू, सर्वांच्या घरी जाऊ का’, असं रणबीर यात म्हणतोय. “मी पिता होणार आहे, माझ्या खांद्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत”, असंही तो पुढे म्हणतो.

ब्रह्मास्त्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय, हेच सांगण्याचा हटके प्रयत्न रणबीरने या व्हिडीओतून केला आहे. मात्र त्याचसोबत ब्रह्मास्त्रचं प्रमोशन करून थकल्याचंही त्याने सांगितलंय. चाहत्यांना रणबीरचा हा व्हिडीओ फारच आवडला आहे. नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.