Gehraiyaan Movie New Song : ‘गेहराईयाँ’चं नवं गाणं रिलीज, ‘बेकाबू’ची सिनेरसिकांच्या मनाला भुरळ
गेहराईयाँ चित्रपटाचं नवं गाणं रिलीज झालंय. बेकाबू हे गाणं सिनेरसिकांच्या पसंतीला उतरताना दिसतंय.
मुंबई : गेहराईयाँ (gehraiyaan) चित्रपटाचं नवं गाणं रिलीज झालंय. बेकाबू (Beqaaboo Song)हे गाणं सिनेरसिकांच्या पसंतीला उतरताना दिसतंय. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीचा रोमान्स पहायला मिळतोय. “तेरी बाहों मे ऐसे खो गये… जेसै खुदसे ही रिहा हो गये…” असे या गाण्याचे बोल आहेत.
सिनेरसिकांचा रिव्ह्यू
दीपिका बॉलिवूडच्या टॉप 5 अभिनेत्री पैकी एक आहे. तिच्या चाहत्यांना दीपिकाच्या नव्या कामाविषयी नेहमीच आदर वाटतो. तिच्या या नव्या सिनेमाचं नवं गाणं पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत. गाणं छान आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे, अशा प्रतिक्रिया या गाण्याच्या कमेंट बॉक्समध्ये पहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
चित्रपटाची कथा
अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ओटीटीवरचा (OTT) पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. यात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल.
सिनेमा कधी प्रदर्शित होणार
गेहराईयाँ हा चित्रपट परवा म्हणजेच ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. Amazon prime वर हा सिनेमा पाहता येईल. दीपिकाचा ओटीटीवरचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमा विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या