Bell Bottom Release: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’!

आता काही राज्यांमध्ये 50 टक्के क्षमतेसह सिनेमागृह उघडण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रात सिनेमा हॉल सुरू करण्याची परवानगी नाही. (Good news for fans, Akshay Kumar's 'Bell Bottom' movie to be released in cinemas!)

Bell Bottom Release: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार अक्षय कुमारचा 'बेल बॉटम'!
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 1:30 PM

मुंबई : कोरोनामुळे सिनेमागृह अनेक दिवसांपासून बंद आहेत. ज्यामुळे चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृहांच्या मालकांचे प्रचंड हाल होत आहेत. नुकतंच, दिल्ली प्रशासनाने 50 टक्के क्षमतेनं दिल्लीतील चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा परिस्थितीत चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चित्रपट निर्मात्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अशा परिस्थितीत आता चित्रपट निर्माते आणि बिग बजेट चित्रपटांचे वितरक यांची सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा वाढली आहे. सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ (Akshay Kumar) या चित्रपटाचा देखील या यादीमध्ये समावेश आहे.

‘बेल बॉटम’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार…

आता काही राज्यांमध्ये 50 टक्के क्षमतेसह सिनेमागृह उघडण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रात सिनेमा हॉल सुरू करण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रातही चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली तर बेल बॉटम लवकरच प्रदर्शित होईल.

50 टक्के क्षमतेनं सिनेमागृह पुन्हा सुरू करण्याच्या दिल्ली सरकारनं निर्णयावर नुकतेच महाराष्ट्रातील प्रमुख प्रदर्शन अक्षय राठी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला खरोखर आशा आहे की हिंदी चित्रपटाचं होम स्टेट मानलं जाणारे महाराष्ट्र देखील सिनेमा हॉल सुरू करण्यास परवानगी देईल.राज्यातील सिनेमागृह मालकांना किमान भाकरी मिळवण्याचा अधिकार आहे.

ऑगस्टमध्ये मुंबईला परवानगी दिली गेली तर चित्रपटगृहं पुन्हा सुरु करता येतील. जर महाराष्ट्रात सिनेमा हॉल खुले झाले तर अक्षय कुमार स्टारर बेल बॉटम 15 ऑगस्टला रिलीज केला जाईल.

अक्षयनं केली होती घोषणा

काही काळापूर्वी अक्षय कुमारनं स्वत: चाहत्यांना माहिती दिली होती की बेल बॉटम चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. अभिनेत्यानं सांगितलं आहे की बेल बेल्टमसाठी तुम्ही संयमानं वाट पाहिली होती, हा चित्रपट जगभरातील मोठ्या पडद्यावर येत आहे… 27 जुलै रोजी. अक्षयच्या या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट आली होती. अक्षयचा कोणताही चित्रपट अनेक दिवसांपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही. अशा परिस्थितीत बेल बॉटम आता सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘बबिता’ने मालिका सोडली ही केवळ अफवाच! ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण

Photo : कियारा, सिद्धार्थ आणि करण कारगिलला रवाना, लष्करातील जवनांसोबत करणार ‘शेरशाह’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Photo : दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंदचा अपघात, तीन जण गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.