Happy Birthday Aditya Pancholi | फिल्मी करिअरसाठी निर्मल पांचोली ‘आदित्य पांचोली’ बनला! वाचा त्याचा बॉलिवूड प्रवास…

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi) 4 जानेवारीला त्याचा 57वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यांचा जन्म 4 जानेवारी 1965 रोजी मुंबईत झाला.

Happy Birthday Aditya Pancholi | फिल्मी करिअरसाठी निर्मल पांचोली ‘आदित्य पांचोली’ बनला! वाचा त्याचा बॉलिवूड प्रवास...
आदित्य पांचोलीकडून चित्रपट निर्मात्याला मारहाण
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 8:00 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi) 4 जानेवारीला त्याचा 57वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यांचा जन्म 4 जानेवारी 1965 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील राजन पांचोली हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत, तर त्याच्या आईचे नाव अरुणा पांचोली आहे. आदित्यचे शालेय शिक्षण मुंबईतील जुहू येथील सेंट जोसेफ हायस्कूलमधून झाले.

अभिनेता आदित्य पांचोलीचे खरे नाव निर्मल पांचोली आहे. आदित्य पांचोलीने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट निर्माता म्हणून केली होती. ‘नारी हिरा’ हा निर्माता म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता. त्याच वेळी, अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट 1986मध्ये प्रदर्शित झालेला ‘सस्ती दुल्हन महंगा दुल्हा’ होता. या चित्रपटात त्याचे नाव आदित्य होते, त्यामुळे त्याने आपले नाव निर्मलवरून बदलून ‘आदित्य’ केले.

टीव्ही शोमध्येही केलेय काम!

चित्रपटांव्यतिरिक्त आदित्यने अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. आदित्य पांचोलीने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सहाय्यक अभिनेता आणि नकारात्मक व्यक्तिरेखा म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर त्यांना ‘कब तक चुप रहूंगी’, ‘कातील’, ‘सैलाब’, ‘लाल परी’, ‘नामचीन’, ‘याद रखेगी दुनिया’, ‘चोर और चांद’ आणि ‘सुरक्षा’  यासारखे चित्रपट त्याला मुख्य अभिनेता म्हणूनही ऑफर करण्यात आले. पण हे चित्रपट काही विशेष जादू करू शकले नाहीत.

महेश भट्ट यांच्या ‘साथी’ या चित्रपटातून आदित्यला खरी ओळख मिळाली. हा चित्रपट 1991 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आदित्यसोबत पूजा भट्टही झळकली होती. चित्रपटात अनेक प्रेम दृश्ये चित्रित करण्यात आली होती आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

अनेक चित्रपट ठरले हिट

या चित्रपटानंतर अनेक मोठे प्रोजेक्ट्स त्याच्या हातात आले. 1990 मध्ये ‘अव्वल नंबर’, 1996 मध्ये ‘जंग’, 1996 मध्ये ‘खिलौना’, 1997 मध्ये ‘येस बॉस’ आणि ‘हमेशा’ या चित्रपटांचा त्यात समवेश होता. याशिवाय ‘ये दिल आशिकाना’ आणि ‘जंग’ हे चित्रपट देखील 2000मध्ये प्रसिद्ध झाले. या चित्रपटांतील त्याची नकारात्मक भूमिका लोकांना आवडली. त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

6 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ!

आदित्यने 1986मध्ये आपल्या पेक्षा वयाने 6 वर्ष मोठ्या असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री जरीना वहाबसोबत लग्न केले. या जोडीला दोन मुले आहेत. त्यांची नावे सूरज पांचोली आणि सना पांचोली आहेत. आदित्य पांचोली हा 90च्या दशकातील सर्वात चार्मिंग अभिनेता होता.

आदित्य पांचोलीने त्याच्या आयुष्यात फिटनेसला खूप प्रोत्साहन दिले आहे. त्याच्या फिटनेसमागचे रहस्य जीम नसून, योगा आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, तो आयुष्यभर कधीही जिममध्ये गेला नाही, त्याने केवळ योगा करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे. आदित्य पांचोलीला क्रिकेट आणि योगामध्ये खूप रस आहे. शालेय जीवनात तो मित्रांसोबत क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचा.

हेही वाचा :

स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.