Happy Birthday Amjad Khan | बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, ‘शोले’चे ‘गब्बर सिंह’ बनून जगभरात गाजले अमजद खान!

अनेकदा आपण एखाद्या अभिनेत्याला त्याच्या खऱ्या नावाऐवजी त्याने साकारलेल्या पात्राने ओळखतो. असंच काहीस प्रसिद्ध अभिनेते अमजद खान (Amjad Khan) यांच्या बाबतीतही आहे. जगभरातील चाहते त्यांना आजही 'गब्बर सिंह' या नावानेही ओळखतात. अभिनेते अमजद खान यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1943ला लाहोरमध्ये झाला.

Happy Birthday Amjad Khan | बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, ‘शोले’चे ‘गब्बर सिंह’ बनून जगभरात गाजले अमजद खान!
Amjad Khan
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 6:34 AM

मुंबई : अनेकदा आपण एखाद्या अभिनेत्याला त्याच्या खऱ्या नावाऐवजी त्याने साकारलेल्या पात्राने ओळखतो. असंच काहीस प्रसिद्ध अभिनेते अमजद खान (Amjad Khan) यांच्या बाबतीतही आहे. जगभरातील चाहते त्यांना आजही ‘गब्बर सिंह’ या नावानेही ओळखतात. अभिनेते अमजद खान यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1943ला लाहोरमध्ये झाला.

अभिनेता अमजद खान यांनी 1951 साली ‘नाजनीन’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाच्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्ष होते.

अमजद खान हे देखील खूप शिकलेले अभिनेते होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्याचा मुलगा शादाब खानच्या म्हणण्यानुसार, अमजद हे मुंबई विद्यापीठातून पर्शियन विषयामधले टॉपर विद्यार्थी होते. ‘शोले’ करण्यापूर्वी ते पत्रकार होण्याच्या मार्गावर होते. त्यांनी काहीकाळ एका वृत्तसंस्थेत कामही केले होते. अमजद खान यांना हिंदी, उर्दू आणि पर्शियन भाषेचे चांगले ज्ञान होते.

‘शोले’साठी नव्हते पहिली पसंती

‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंह’ या व्यक्तिरेखेसाठी अमजद खान हे पहिली पसंती नव्हती. या भूमिकेसाठी सर्वप्रथम अभिनेता डॅनी यांना संपर्क करण्यात आला होता. मात्र अभिनेता डॅनी त्यावेळी फिरोज खान यांच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते आणि त्यामुळे डॅनी यांनी ‘शोले’ चित्रपट करण्यास नकार दिला.

डॅनी यांच्या नकारानंतर अभिनेता अमजद खान यांना ‘गब्बर’ची भूमिका मिळाली. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी ‘शोले’ चित्रपटासाठी अमजद खानचे नाव सुचवले होते.

अमजद खान यांनी 1973 साली ‘हिंदुस्तान की कसम’ या चित्रपटातून नायक म्हणून पदार्पण केले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘शोले’ या चित्रपटातून. अमजद खान यांना जवळून ओळखणारे सांगतात की, अमजद हे चहा पिण्याचे शौकीन होता. ते दररोज तब्बल तीस कप चहा प्यायचे आणि जेव्हा त्याला चहा मिळायची नाही, तेव्हा त्यांना काम करणे देखील कठीण व्हायचे.

दुर्घटनेने बदलले आयुष्य

अमजद खान ‘द ग्रेट गॅम्बलर’ चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत काम करत असताना एक दुर्घटना घडली. या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात होणार होते आणि त्यासाठीच अमजद खान आपल्या कुटुंबासह गोव्याला निघाले होते, पण वाटेत अमजद खान यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला ज्यात अमजद खान गंभीर जखमी झाले.

या अपघातात अमजद खान यांचे जबरदस्त नुकसान झाले होते. या अपघातामुळे अमजद खान बराच वेळ व्हील चेअरवर बसून राहिले. त्यांना ऑपरेशन करावे लागले. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी अमजद खान आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप मदत केली. अपघातात जे घडलं त्यावरून अमजद खानचा वाईट टप्पा नुकताच सुरू झाल्यासारखा वाटत होता. येथून अमजद खान यांचे वजन वाढू लागले. अमजद खान ही अशी व्यक्ती होती ज्यांनी फिटनेसला खूप प्राधान्य दिले. रोज बॅडमिंटन खेळणे, व्यायाम करणे ही अमजद खानची सवय झाली होती, पण अपघातानंतर सर्व काही थांबले. वाढत्या वजनामुळे अमजद खान यांची प्रकृती इतकी बिघडली की ते कोमात गेले. काही काळानंतर तोही त्यातून बाहेर आले होते. 27 जुलै 1992 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अमजद खान यांचे निधन झाले.

हेही वाचा :

शॉर्ट ड्रेस परिधान करून एअरपोर्टवर अवतरली उर्वशी रौतेला, अभिनेत्रीची स्टाईल पाहून खिळतील नजरा!

Aai Kuthe Kay Karte | आशुतोष केळकर अरुंधतीला देणार नव्या म्युझिक अल्बमची ऑफर, संधीचं स्वीकारून ‘आई’ पुढे जाईल?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.