AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Arjun Rampal | मॉडेल ते बॉलिवूड अभिनेता, दिल्लीतील एका पार्टीने बदललं अर्जुन रामपालचं आयुष्य!

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या सिनेसृष्टीतील स्टार्समध्ये अर्जुन रामपालच्या (Arjun Rampal) नावाचा देखील समावेश आहे. यानंतर अर्जुनवर अचानक एका फॅशन डिझायनरचे लक्ष गेले आणि त्यानंतर त्याचे आयुष्य असे बदलले की, त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही.

Happy Birthday Arjun Rampal | मॉडेल ते बॉलिवूड अभिनेता, दिल्लीतील एका पार्टीने बदललं अर्जुन रामपालचं आयुष्य!
Arjun Rampal
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या सिनेसृष्टीतील स्टार्समध्ये अर्जुन रामपालच्या (Arjun Rampal) नावाचा देखील समावेश आहे. यानंतर अर्जुनवर अचानक एका फॅशन डिझायनरचे लक्ष गेले आणि त्यानंतर त्याचे आयुष्य असे बदलले की, त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. आज (26 नोव्हेंबर) अर्जुन रामपालचा वाढदिवस आहे. अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

अभिनेता अर्जुन रामपाल याचा जन्म 26 नोव्हेंबर 1972 रोजी जबलपूर येथे झाला. अर्जुनचा जन्म एका लष्करी कुटुंबात झाला आहे. अर्जुनने आपले सुरुवातीचे शिक्षण त्याच शाळेत घेतले, जेथे त्याची आई शिकवत होती. त्यानंतर अर्जुनने दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. एकदा अर्जुन दिल्लीत एका हायप्रोफाईल पार्टीला गेला होता. हा तोच तो दिवस होता, ज्या दिवशी त्याचे नशीब चमकणार होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल याने अर्जुनला याच पार्टीत पाहिले आणि इथूनच अर्जुनने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले. बघता बघता रोहितच्या मदतीने अर्जुन मॉडेलिंग इंडस्ट्रीचा एक चमकता तारा बनला.

पहिल्याच चित्रपटाने मिळवली वाहवा!

अर्जुनने 1994 मध्ये ‘सोसायटी फेस ऑफ द इयर’ पुरस्कारही जिंकला होता. मॉडेलिंग विश्वात प्रसिद्धी मिळवल्यानंतर अर्जुनने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. अर्जुनचा पहिला चित्रपट ‘प्यार इश्क और मोहब्बत’ हा 2001 साली प्रदर्शित झाला होता. पदार्पणाच्या चित्रपटातूनच अर्जुनचे समीक्षकांनी कौतुक केले होते, त्यानंतर त्याला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठीही नामांकन मिळाले होते.

सुरुवातीला अर्जुनचे अनेक चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकले नाहीत. त्यानंतर अर्जुनच्या ‘डॉन’ चित्रपटाने यश मिळवले आणि त्याच्या यशाची गाडी वेगाने धावू लागली. अर्जुनच्या हिट सिनेमांमध्ये ‘रॉक ऑन’, ‘राजनीती’ या चित्रपटांचा समावेश आहे.

अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्य…

अर्जुन रामपालने 1998 साली मिस इंडिया आणि मॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले. अर्जुनने मेहर जेसियाशी लग्न केले तेव्हा तो स्ट्रगल करत होता. मेहर त्यावेळी सुपरमॉडेल होती. असं म्हटलं जातं की, त्यावेळी अर्जुन आपल्या खोलीत मेहेरचे पोस्टर लावायचा आणि बीवी हो तो ऐसी म्हणायचा. त्याचे म्हणणेही खरे ठरले, ती त्याची पत्नी झाली, पण आता दोघांचे नाते तुटले आहे. 20 वर्षांच्या लग्नानंतर त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना दोन मुलीही आहेत. घटस्फोटानंतर दोन्ही मुलींची जबाबदारी मेहर यांच्यावर आली आहे.

दुसरीकडे अर्जुननेही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. लवकरच तो त्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रिएड्स लग्न करू शकतात. गॅब्रिएलाने काही काळापूर्वी अर्जुनचा मुलगा एरिकला जन्म दिला आहे. अर्जुन आणि गॅब्रिएलाच्या पहिल्या भेटीबद्दल सांगायचे तर, दोघेही एका पार्टीत भेटले होते.

हेही वाचा :

Bhediya First Look : वरुण धवन बनलाय खतरनाक ‘भेडिया’, अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहिलात का?

बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा, मोठ्या पडद्यावर दिसणार ‘पावनखिंड’चा अजरामर इतिहास!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.