Happy Birthday Asha Parekh | एकदा प्रेमभंग झाल्यानंतर आजन्म अविवाहित राहिल्या आशा पारेख, पद्मश्री पुरस्कारावरही कोरलंय नाव!
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी झाला. आशा पारेख या वर्षी 79 वर्षांच्या होणार आहेत. अभिनेत्री आशा पारेख हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी झाला. आशा पारेख या वर्षी 79 वर्षांच्या होणार आहेत. अभिनेत्री आशा पारेख हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. एक काळ असा होता की, प्रत्येक जण आशा पारेखसाठी वेडा होता. त्याच वेळी, आशा पारेख यांनीही एका व्यक्तीवर खूप प्रेम केले. 1959 ते 1973 पर्यंत आशा पारेख बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री राहिल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही मनोरंजक किस्से सांगणार आहोत…
अभिनेत्री आशा पारेख यांनी ‘माँ’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आशा पारेख भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. आशा पारेख यांचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट ‘दिल दे के देखो’ होता. हा चित्रपट यशस्वी झाला. सुमारे 80 चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेल्या आशा पारेख यांचे सर्व चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले. ज्यात ‘जब प्यार किसी से होता है’, ‘घराना’, ‘भरोसा’, ‘मेरे सनम’, ‘तीसरी मंजिल’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘शिकार’, ‘साजन’, ‘आन मिलो सजना’ हे काही विशेष गाजलेले चित्रपट आहेत.
यांच्या फॅन आहेत आशा पारेख
1971मध्ये, ‘कटी पतंग’ चित्रपटाच्या 10 वर्षानंतर, आशा यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आशा पारेख, अभिनेत्री वैजयंतीमाला आणि अभिनेता दिलीप कुमार यांच्या सर्वात मोठ्या फॅन आहेत. 1966 साली प्रदर्शित झालेला त्यांचा ‘तीसरी मंझिल’ हा चित्रपट त्यांच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो.
आणि आजन्म राहिल्या अविवाहित!
आशा पारेखने कधीच लग्न केले नव्हते, पण त्यांच्या आणि दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्या अफेअरबद्दल बरीच चर्चा झाली. नासिर हुसेन हे आमिर खानचे काका आहेत. नासीर हुसेनशी लग्न न करण्याच्या विषयावर, आशा पारेख यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, नासीर हुसेनला त्यांच्या कुटुंबापासून कधीही वेगळे व्हायचे नवहते, त्यामुळे त्यांनी लग्न केले नाही. आशा पारेख यांची प्रतिमा एका अभिनेत्रीची आहे, जिच्यापर्यंत पोहोचणे किंवा जिला भेटणे सहज आणि सोपे नाही आणि म्हणूनच कदाचित कोणीही नंतर त्यांना लग्नासाठी मागणी घालयला धजावले नाही.
मानाच्या पुरस्कारांवर कोरले नाव
अभिनेत्री आशा पारेख प्रेमात अपयशी झाल्यानंतर आजन्म अविवाहित राहिल्या आणि त्यांनी कधीच लग्न केले नाही. त्यांनी चित्रपटांमधून खूप नाव कमावले. आशा पारेख यांना 1972 मध्ये ‘कटी पतंग’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार आणि 2002 मध्ये चित्रपटांमध्ये त्यांच्या योगदानासाठी ‘फिल्मफेअर लाइफ टाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार मिळाला. तर, त्याचवेळी आशा पारेख यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा :
Break Point Review : दिग्दर्शनात थोडी कमी असली तरीही महेश आणि लिअँडर जोडीने मने जिंकली