Happy Birthday Chiranjeevi  | स्टार, मेगास्टार ते राजकीय नेता, वाचा दक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांचा प्रवास…

चिरंजीवी हे टॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध अभिनेते आहेत. चिरंजीवी हे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक चर्चेत असलेले अभिनेते मानले जातात. त्याच्याबद्दल त्याच्या चाहत्यांची क्रेझ पाहण्यासारखी आहे. हेच कारण आहे की जेव्हा चिरंजीवी चित्रपट सोडून राजकारणाकडे वळले तेव्हा लोकांनी त्यांना तिथेही खूप प्रेम दिले.

Happy Birthday Chiranjeevi  | स्टार, मेगास्टार ते राजकीय नेता, वाचा दक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांचा प्रवास...
चिरंजीवी
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 9:04 AM

मुंबई : बॉलिवूडमधील स्टारडम म्हणजे तुमच्या चाहत्यांची संख्या आणि तुमच्या चित्रपटांचे यश. बऱ्याचदा बॉलिवूडचे स्टारडम पाहून लोकांचे डोळे थक्क होतात, पण जर तुम्हाला स्टारडमचा खरा चेहरा पाहायचा असेल तर तुम्ही दाक्षिणात्य सिनेमाकडे वळायला हवे. रजनीकांत आणि चिरंजीवी (Chiranjeevi) या सारख्या कलाकारांचा तेथील जनतेवर असणारा प्रभाव पाहायलाच हवा.

चिरंजीवी हे टॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध अभिनेते आहेत. चिरंजीवी हे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक चर्चेत असलेले अभिनेते मानले जातात. त्याच्याबद्दल त्याच्या चाहत्यांची क्रेझ पाहण्यासारखी आहे. हेच कारण आहे की जेव्हा चिरंजीवी चित्रपट सोडून राजकारणाकडे वळले तेव्हा लोकांनी त्यांना तिथेही खूप प्रेम दिले. आज (22 ऑगस्ट) या टॉलीवुड मेगास्टारचा वाढदिवस आहे.

पुरस्कारांची रांग

चिरंजीवी त्यांच्या सर्वोत्तम आणि रेकॉर्ड ब्रेकिंग चित्रपटांमुळे भारतीय माध्यमांमध्ये “मेगास्टार” म्हणून लोकप्रिय आहेत. चिरंजीवी यांना सात वेळा दक्षिण भारतीय फिल्मफेअर पुरस्कार आणि चार वेळा नंदी पुरस्कार मिळाला आहे. चिरंजीवी यांना त्यांच्या पहिल्याच हिंदी चित्रपट ‘प्रतिबंध’साठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

बालपणापासून अभिनयाची आवड

चिरंजीवी यांचा जन्म 22 ऑगस्ट 1955 रोजी आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात झाला. चिरंजीवीचे खरे नाव कोनिडेल शिव शंकर वारा प्रसाद आहे. चिरंजीवी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. चिरंजीवी यांनी सीएसआर शर्मा कॉलेज, ओगोळे (आंध्र प्रदेश) मधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते चेन्नईला आले आणि येथे आल्यानंतर त्यांनी अभिनय शिकण्यासाठी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. 1980 मध्ये त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी कलाकार अल्लू राम लिंगैया यांची मुलगी सुरेखाशी लग्न केले. चिरंजीवी यांना दोन मुली (सुष्मिता आणि श्रीजा) आणि एक मुलगा रामचरण तेजा (तेलुगु चित्रपट अभिनेता) आहे.

अभिनय कारकिर्दीची सुरुवात

अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर चिरंजीवी यांनी ‘पुनाधीरल्लू’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘प्रणाम खरीदू’ हा चित्रपट प्रथम प्रदर्शित झाला होता, मात्र त्यातून त्यांना काही जादू दाखवता आली नव्हती. प्रसिद्ध दिग्दर्शक बापू यांच्या ‘मना पुरी पंडावलू’ या चित्रपटातून चिरंजीवी यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. I Love You आणि Idi Katha Kaadu या चित्रपटांमध्ये छोट्या पण प्रमुख भूमिका साकारल्यानंतर चिरंजीवीच्या अभिनय कारकिर्दीला आणखी चालना मिळाली.

1979 मध्ये चिरंजीवी यांचे तब्बल आठ चित्रपट आणि 1980मध्ये तब्बल चौदा मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. यानंतर चिरंजीवीने ‘मोसागडू’, ‘राणी कसुला रंगम्मा’ सारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकरून बरीच लोकप्रियता मिळवली .

‘इंद्रा’ने मोडले रेकॉर्ड

1980चे दशक चिरंजीवीच्या कारकिर्दीसाठी खूप महत्वाचे आणि यशस्वी ठरले. नव्वदच्या दशकातही चिरंजीवींनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. 1997 मध्ये त्यांनी ‘हिटलर’ चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयासाठी समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळवली. 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंद्रा’ या चित्रपटाने यशाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले. राजकारणात येण्यापूर्वी चिरंजीवी यांचा शेवटचा चित्रपट ‘शंकर दादा जिंदाबाद’ हा होता.

राजकारणात प्रवेश

2008 मध्ये चिरंजीवी यांनी आंध्र प्रदेशातील सर्व घटकांना सामाजिक न्याय देण्याच्या उद्देशाने ‘प्रजा राज्यम पार्टी’ नावाच्या प्रादेशिक राजकीय पक्षाची स्थापना केली. 2009च्या विधानसभा निवडणुकीत चिरंजीवींच्या पक्षाने अठरा जागा जिंकल्या. पण 2011मध्ये त्यांचा पक्ष औपचारिकरित्या आंध्र प्रदेशातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये विलीन झाला. आता पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे की, चिरंजीवी पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळतील.

समाजकार्यातही अग्रेसर

चित्रपट आणि पक्ष या व्यतिरिक्त चिरंजीवी यांची ओळख ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील आहे. चिरंजीवी यांनी 1998 मध्ये ‘चिरंजीवी चॅरिटी ट्रस्ट’ची स्थापना केली होती. ज्यात रक्तपेढी आणि अनेक नेत्र बँका (नेत्रदान केंद्रे) आहेत. आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या संस्थेला जास्तीत जास्त रक्त मदतनिधी जमा केल्याबद्दल बक्षीसही दिले आहे.

हेही वाचा :

‘उसकी हटेगी तो सबकी फटेगी’, पाहा टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉनच्या ‘गणपथ’चा दमदार टीझर!

आई कशी, गोड गोड मिठाईच जशी! पाहा ‘अरुंधती’ फेम मधुराणी आणि मिठाईचं हे भन्नाट कनेक्शन

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.