Happy Birthday Dalip Tahil | बॉलिवूडच्या पडद्यावरचे लाडके खलनायक, वाचा अभिनेते दलीप ताहिल यांच्याबद्दल…
बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक दलीप ताहिल (Dalip Tahil) यांचा आज (30 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1952 मध्ये उत्तर प्रदेश, आगर येथे झाला. त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक दलीप ताहिल (Dalip Tahil) यांचा आज (30 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1952 मध्ये उत्तर प्रदेश, आगर येथे झाला. त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या काळापासून दलीप नाटकांमध्ये भाग घेत होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…
अभिनेते दलीप ताहिल यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. 1974 मध्ये दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दलीप यांना त्यांच्या ‘अंकुर’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. याशिवाय ते रमेश सिप्पी यांच्या ‘शान’मध्ये देखील दिसले. या अभिनेत्याने चित्रपटांमध्ये येताच आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्याने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दलीप यांनी ‘कयामत तक’, ‘बाजीगर’, ‘त्रिदेव’, ‘किशन कन्हिया’, ‘कहो ना प्यार है’, ‘डर’, ‘इश्क’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘हम है राही प्यार के’, ‘राम लखन’, ‘थानेदार’ यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
टेलिव्हिजनवरही ताहिल यांची धमाकेदार एन्ट्री!
ताहिलने संजय खानच्या ‘द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान’ आणि रमेश सिप्पी यांच्या ‘बुनियाद’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्याने यापूर्वी ब्रिटिश टेलिव्हिजन शो ‘बॉम्बे ब्लू’मध्ये काम केले आहे. या अभिनेत्याने 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर बीबीसी सोप ऑपेरा ‘इस्टेंडर्स’ मध्ये डॅन फरेरा ही भूमिका साकारली होती. याशिवाय बीबीसीच्या मिनी सीरीज ‘न्यूक्लियर सिक्रेट’मध्येही ते दिसले होते. याशिवाय ‘सिया के राम’मध्ये त्यांनी ‘राजा दशरथा’ची भूमिका साकारली होती.
ताहिल यांनी सांगितले होते की, गेल्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. पण ‘भाग मिल्खा भाग’मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका साकारणे आव्हानात्मक होते.
‘मी टू’ मोहिमेमुळे चर्चेत आले!
दिलीप ताहिल यांनी ‘मी टू’ मोहिमेदरम्यान एक विधान केले होते, ज्यामुळे ते खूप चर्चेत होते. एका दिग्दर्शकाने मुलीला न कळवता बलात्काराचा सीन कसा शूट करायला सांगितला, हे अभिनेत्याने सांगितले होते. ताहिल म्हणाले की, ‘मी हा सीन करण्यास नकार दिला होता आणि आधी मुलीला सीन समजावून सांगण्यास सांगितले होते. पण दिग्दर्शक निघून गेले. त्यानंतर दलीप ताहिलने मुलीला चित्रपटाचा सीन समजावून सांगितला. त्यानंतर ती रडायला लागली आणि तिच्या खोलीकडे निघून गेली.’
दलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल यांना ड्रग्ज खरेदी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याबाबतची माहितीही एनसीबीने दिली होती.
हेही वाचा :
RIP Yusuf Husain | अभिनेता युसूफ हुसैन यांचे निधन, हंसल मेहता यांनी शेअर केली भावनिक पोस्ट!