AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Dharmendra | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे रेल्वेत नोकरी, दुसऱ्या लग्नासाठी बदलले नाव!

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा आज 86वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी लुधियाना जिल्ह्यातील (पंजाब) नसराली गावात एका जाट कुटुंबात झाला. धर्मेंद्र यांचे खरे नाव धरम सिंह देओल आहे.

Happy Birthday Dharmendra | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे रेल्वेत नोकरी, दुसऱ्या लग्नासाठी बदलले नाव!
Dharmendra
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 7:45 AM
Share

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा आज 86वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी लुधियाना जिल्ह्यातील (पंजाब) नसराली गावात एका जाट कुटुंबात झाला. धर्मेंद्र यांचे खरे नाव धरम सिंह देओल आहे. त्यांच्या वडिलांचे नाव केवल किशन सिंह देओल आणि आईचे नाव सतवंत कौर आहे. त्यांचे मूळ गाव दानगाव पखोवालजवळ रायकोट तालुक्यात आहे. धर्मेंद्र यांचे बालपण साहनेवाल गावात गेले. सुमारे सहा दशकांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत.

अभिनयच नव्हे तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली असून, राजकारणातही हात आजमावला आहे. अशा परिस्थितीत धर्मेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

दहावीपर्यंतच घेतले शिक्षण!

धर्मेंद्र यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण लुधियाना येथील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत झाले. या शाळेत त्यांचे वडील मुख्याध्यापक होते. त्यांनी 1952मध्ये रामगढिया कॉलेज, फगवाडा येथून इंटरमिजिएट पूर्ण केले. ते केवळ दहावीपर्यंतच शिकू शकले. धर्मेंद्र यांना ‘ही मॅन’, ‘गरम धरम’, ‘अॅक्शन किंग’ आणि ‘धरमजी’ या टोपणनावांनीही ओळखले जाते. ते त्यांच्या काळातील सर्वात हुशार आणि रोमँटिक अभिनेता म्हणून ओळखले जात होते.

धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत त्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत काम केले होते. धर्मेंद्र यांनी प्रसिद्ध अभिनेत्री सुरैयाचा ‘दिल्लगी’ हा चित्रपट गावापासून मैल दूर असलेल्या थिएटरमध्ये जाऊन पाहिला आणि ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी चित्रपटांमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘दिल्लगी’ हा चित्रपट 40 हून अधिक वेळा पाहिला होता.

‘दिल भी तेरा हम भी तेरे’मधून करिअरची सुरुवात

धर्मेंद्र यांच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 1960मध्ये अर्जुन हिंगोरानीच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाने झाली. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘फूल और पत्थर’ या चित्रपटातून. ‘यमला पगला दिवाना फिर से’ या चित्रपटात ते शेवट झळकले होते. धर्मेंद्र चित्रपटात येण्यापूर्वी रेल्वेत नोकरी करत होते. या नोकरीत त्यांना महिन्याला दीडशे रुपये पगार मिळायचा. धर्मेंद्र यांनी त्यांच्या 6 दशकांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत ‘सत्यम’, ‘बंदिनी’, ‘शोले’, ‘जुगनू’, ‘अनुपमा’, ‘धर्मवीर’ आणि ‘चुपके-चुपके’ असे अनेक उत्तम चित्रपट केले.

त्यांनी त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री नूतन, सायरा बानो, नंदा, मीना कुमारी आणि माला सिन्हा यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. धर्मेंद्रची सर्वाधिक जोडी हेमा मालिनी यांच्यासोबत जमली. या जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. 1991मध्ये धर्मेंद्र यांच्या ‘घायल’ या चित्रपटाला निर्माता म्हणून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी राजकारण आणि टीव्ही शोमध्येही नशीब आजमावले होते.

प्रेमासाठी नाव बदलले आणि पुन्हा लग्न केले!

धर्मेंद्र यांचे पहिले लग्न 1954 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. या जोडप्याला चार मुले होती. दोन मुले सनी देओल, बॉबी देओल आणि दोन मुली विजेता देओल आणि अजिता देओल. चित्रपटांमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले. हेमासोबतच्या प्रेम आणि लग्नासाठी धर्मेंद्र यांनी 1981मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून दिलावर खान ठेवले आणि हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. या जोडीला ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत.

राजकारणातही आजमावले नशीब

धर्मेंद्र यांनी राजकारणातही हात आजमावला आहे. 2004 मध्ये, त्यांनी भाजपच्या तिकिटावर राजस्थानमधील बिकानेरमधून लोकसभा निवडणूक जिंकली आणि 2009 पर्यंत ते खासदार होते. यानंतर त्यांनी राजकारणाचा निरोप घेतला. धर्मेंद्र यांना 2012 मध्ये भारत सरकारने चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देशातील तिसरा सर्वोच्च सन्मान ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केले होते.

हेही वाचा :

Sai Tamhankar | सई ताम्हणकरला मिळालंय मानाचं स्थान! IMDBच्या ‘टॉप 10’मध्ये अभिनेत्रीचं नाव!

Vijeta | भूमिकेसाठी कायपण! अभिनेत्री प्रीतम कागणेने ‘विजेता’ चित्रपटातील भूमिकेसाठी घटवले वजन!

vicky-Katrina Wedding : विकी आणि कॅटरिना बनले पती-पत्नी, घरातच केलं लग्नाचं रजिस्टर मॅरेज!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.