Happy Birthday Jubin Nautiyal | ज्या गाण्याच्या कार्यक्रमात झाला रिजेक्ट, त्याच कार्यक्रमात परीक्षक म्हणून लावली हजेरी, वाचा गायक जुबिन नौटियालचा संघर्ष

जुबिन नौटियाल गायक होण्यासाठी वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईत आला होता. तो एका रिअ‍ॅलिटी शोचा भाग होण्यासाठी इथे आला होता. नंतर त्याने इंडियन आयडॉलसाठी ऑडिशन दिले, पण तिथे तो रिजेक्ट झाला. त्यानंतर तो पुन्हा आपल्या घरी परतला.

Happy Birthday Jubin Nautiyal | ज्या गाण्याच्या कार्यक्रमात झाला रिजेक्ट, त्याच कार्यक्रमात परीक्षक म्हणून लावली हजेरी, वाचा गायक जुबिन नौटियालचा संघर्ष
जुबिन नौटियाल
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 1:28 PM

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकालाच संगीत ऐकणे खूप आवडते. काहींना रोमँटिक,  तर काहींना पार्टी साँग्स खूप आवडतात.  तर काही लोक केवळ त्यांचे मन शांत करण्यासाठी संगीत ऐकतात. संगीतात इतकी शक्ती असते की, हे एका दु:खी चेहऱ्यावरही स्मित आणू शकतात आणि तणाव कमी होऊन लोकांना बरे वाटते. चित्रपटसृष्टीत असे अनेक गायक आहेत, ज्यांचे गाणे तुम्ही ऐकताच आपला दिवस चांगला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गायकाबद्दल सांगणार आहोत. हा गायक आहे जुबिन नौटियाल!( Happy Birthday Jubin Nautiyal know about singers struggle story)

गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) आज (14 जून) आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहेत. हे स्थान मिळवणे जुबिनसाठी सोपे नव्हते. ते मिळवण्यासाठी त्याने खूप परिश्रम घेतले आहेत. त्याला बर्‍याच वेळा नकारांचा सामना करावा लागला. यानंतर त्याने आपले ध्येय निश्चित केले आणि सर्वांना दाखवून दिले की, तो गाण्यात कोणापेक्षाही कमी नाही.

रिअॅलिटी शोमध्ये झाला रिजेक्ट!

जुबिन नौटियाल गायक होण्यासाठी वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईत आला होता. तो एका रिअ‍ॅलिटी शोचा भाग होण्यासाठी इथे आला होता. नंतर त्याने इंडियन आयडॉलसाठी ऑडिशन दिले, पण तिथे तो रिजेक्ट झाला. त्यानंतर तो पुन्हा आपल्या घरी परतला. घरी गेल्यावर झुबिनने तीन वर्षे कठोर रियाझ केला आणि त्यानंतर तो परत मुंबईला आला आणि त्याने स्वतःला सिद्ध केले. अलीकडेच तो याच शोमध्ये खास पाहुणा परीक्षक म्हणून आला होता.

ए.आर. रहमान यांनी दिला होता सल्ला

वयाच्या 17व्या वर्षी जुबिन संघर्ष करण्यासाठी मुंबईला आला, तेव्हा त्याची भेट ए.आर. रहमान यांच्याशी झाली. अलीकडेच जुबिन जेव्हा इंडियन आयडॉलमध्ये आला, तेव्हा त्याने सांगितले होते की जेव्हा तो प्रथम मुंबईत आला, तेव्हा ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाल्यानंतर त्याने अनेक दिग्दर्शकांची भेट घेतली होती. याच दरम्यान त्याची एआर रहमान यांच्याशी भेट झाली. जुबिनने सांगितले की, ‘एआर रहमान यांनी जुबिनचा आवाज ऐकला आणि तेव्हा ते म्हणाला होते की, तुला आता रियाजाची खूप गरज आहे. तुझा आवाज अद्याप तयार झालेला नाही. आता तू घरी परत आणि रियाझ करुन परत मुंबईला ये.’

जुबिन नौटियालला ‘सोनाली केबल’ चित्रपटाच्या ‘इक मुलाकात’ या गाण्यातून त्याला ओळख मिळाली. या गाण्यानंतर जुबिनने एकामागून एक सुपरहिट गाणी दिली. यात ‘मेहरबानी’, ‘कुछ तो बता जिंदगी’, ‘बंदेया’ यासह अनेक सुपर हिट गाणी दिली आहेत. जुबिन नौटियाल याच्या गाण्यांनी त्याला सुपरस्टार बनवले आहे. आता, जुबिनचे प्रत्येक गाणे रिलीज होताच सुपरहिट होते.

(Happy Birthday Jubin Nautiyal know about singers struggle story)

हेही वाचा :

Sushant Singh Rajput Death Anniversary | ‘फिर मिलेंगे चलते चलते…’, अंकिता लोखंडेने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!

Happy Birthday Kirron Kher | विवाहित असतानाही एकमेकांच्या प्रेमात पडले, वाचा किरण-अनुपम खेर यांची लव्हस्टोरी!

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.