Happy Birthday Katrina Kaif | सलमान खान ते अक्षय कुमार प्रत्येक अभिनेत्यासोबत सुपरहिट ठरली कतरिनाची जोडी!

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आज आपला 38वा वाढदिवस साजरा करत आहे. कतरिनाचा जन्म 16 जुलै 1983 रोजी हाँगकाँगमध्ये झाला होता.

Happy Birthday Katrina Kaif | सलमान खान ते अक्षय कुमार प्रत्येक अभिनेत्यासोबत सुपरहिट ठरली कतरिनाची जोडी!
कतरिना कैफ
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 11:35 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आज आपला 38वा वाढदिवस साजरा करत आहे. कतरिनाचा जन्म 16 जुलै 1983 रोजी हाँगकाँगमध्ये झाला होता. ‘बूम’ या चित्रपटाद्वारे कतरिनाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त जादू करू शकला नाही. यानंतर कतरिना सलमान खान सोबत ‘मैने प्यार क्यू किया’मध्ये दिसली होती. तेव्हापासून ती बॉलिवूडमध्ये व्यस्त झाली.

कतरिनाने बॉलिवूडच्या सगळ्याच सुपरस्टार्सबरोबर काम केले आहे आणि त्यांचे चित्रपट सुपरहिट झाले होते. ज्यानंतर कतरिनाने बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आपले स्थान बनवले.

सलमान खान आणि कतरिना कैफ

केवळ सलमान खानसोबत काम करून कतरिना कैफ बॉलिवूडमध्ये आपले हक्काचे स्थान निर्माण करू शकली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यापैकी काही म्हणजे ‘टायगर’, ‘पार्टनर’, ‘युवराज’. आता दोघेही लवकरच ‘टायगर जिंदा है 3’मध्ये दिसणार आहेत.

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ

अक्षय कुमार आणि कतरिना कैफने एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दोघांची केमिस्ट्री प्रत्येक वेळी चाहत्यांची मने जिंकते. अक्षय आणि कतरिनाने ‘दे दना दन’, ‘नमस्ते लंडन’, ‘हमको दीवाना कर गये’ आणि ‘सिंग इज किंग’ अशा बर्‍याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघेही लवकरच ‘सूर्यवंशी’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

शाहरुख खान आणि कतरिना कैफ

‘किंग ऑफ रोमान्स’ शाहरुख खानसोबत कतरिना कैफने दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांनी पहिल्यांदा ‘जब तक है जान’मध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर दोघेही ‘झिरो’मध्ये एकत्र दिसले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमवू शकला नाही, पण कतरिनाचा अभिनय चांगलाच गाजला होता.

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ

रणबीर कपूर आणि कतरिना कैफची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. दोघांनी दोन चित्रपटात एकत्र काम केले आहे. ज्यामध्ये ‘अजब प्रेम की गजब कहानी’ आणि ‘जग्गा जासूस’चा समावेश आहे. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चांगलीच पसंत केली गेली.

विक्की कौशल आणि कतरिना कैफ

विक्की कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आहेत. दोघेही बर्‍याचदा एकत्र दिसतात. पण नेहमी असे म्हणतात की, ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. करण जोहरच्या चॅट शोमध्ये कतरिनाने म्हटले होते की, तिला विक्की कौशलसोबत काम करायचे आहे.

(Happy Birthday Katrina Kaif actress paired up with every actor from Salman Khan to Akshay Kumar)

हेही वाचा :

Zindagi Na Milegi Dobara  | ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ची दमदार 10 वर्ष, कलाकारांनी शेअर केल्या खास आठवणी!

अमिताभ बच्चनपेक्षाही अधिक मानधन घेणारे प्राण जेव्हा बॉबीसाठी 1 रुपया आकारतात, वाचा किस्सा…

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.