Happy Birthday Tanuja | 70च्या दशकातल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा, एका ‘थप्पड’ने सुरु झाली होती कारकीर्द!

70च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री तनुजा (Tanuja) त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत. 23 सप्टेंबर 1943 रोजी तनुजा यांचा जन्म झाला. या वर्षी तनुजा त्यांचा 78वा वाढदिवस साजरा करणार आहेत. तनुजा चित्रपटाच्या पार्श्वभूमीशी संबंधित होत्या, त्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच नायिका बनण्याची इच्छा होती.

Happy Birthday Tanuja | 70च्या दशकातल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा, एका ‘थप्पड’ने सुरु झाली होती कारकीर्द!
Tanuja
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 7:50 AM

मुंबई : 70च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री तनुजा (Tanuja) त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत. 23 सप्टेंबर 1943 रोजी तनुजा यांचा जन्म झाला. या वर्षी तनुजा त्यांचा 78वा वाढदिवस साजरा करणार आहेत. तनुजा चित्रपटाच्या पार्श्वभूमीशी संबंधित होत्या, त्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच नायिका बनण्याची इच्छा होती. तनुजा यांच्या आई शोभना समर्थ देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि त्यांचे वडील निर्माता कुमारसेन समर्थ होते. तर, तनुजा यांनी देखील चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांच्याशी लग्न केले. चला तर तनुजा यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया…

जर, काजोल एक उत्तम अभिनेत्री बनू शकली आहे, तर ती फक्त तिच्या आईमुळे! आईला पाहूनच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली होती. तनुजा यांच्या आई शोभना समर्थ आणि मोठी बहीण नूतन देखील हिंदी चित्रपटांच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. म्हणूनच तनुजा यांना देखील अभिनेत्री बनायचे होते. तनुजा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात फिल्म मेकर केदार शर्माच्या ‘हमारी बेटी’ या चित्रपटातून केली. तनुजा यांना वाटले की, आपली आई आणि बहीण प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, त्यामुळे आपल्याला अभिनयात कोणतीही अडचण येणार नाही.

आणि दिग्दर्शकाने लगावली थप्पड!

पण पहिल्याच चित्रपटात त्यांच्यासोबत असे काही घडले ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. 1960मध्ये तनुजा यांना त्यांची आई शोभना समर्थ यांनी ‘छबिली’ चित्रपटातून लाँच केले होते. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, तनुजा इतक्या नखरे दाखवायच्या की, संपूर्ण युनिट त्यांच्यावर नाराज व्हायचे. केदार शर्मा यांच्या चित्रपटातही त्यांनी असेच केले. तनुजा नेहमी सेटवर हसण्यात आणि विनोद करण्यात व्यस्त असायच्या. पण केदार शर्मा यांना हे सर्व अजिबात आवडले नाही.

चित्रपटाच्या एका दृश्यात तनुजा यांना रडायचे होते, पण त्या सतत पुन्हा पुन्हा हसत होत्या. हे एकदा नव्हे तर अनेक वेळा घडले. तनुजा यांनी त्यांचे काम अजिबात गांभीर्याने घेतले नाही. तनुजा यांनी केदार शर्मा यांना सांगितले की, आज मी रडण्याच्या मूडमध्ये नाही. याचा राग आल्याने केदार शर्माने तनुजा यांना एक थप्पड लगावली. हे पाहून संपूर्ण टीम स्तब्ध झाली. या चित्रपटाचे नायक राज कपूर हळूच बाहेर सटकले आणि तनुजा यांनी संपूर्ण सेट डोक्यावर घेतला. रडत रडत त्या केदार शर्मा यांची तक्रार करण्यासाठी आई शोभनाकडे गेल्या.

असा चीत्र्त झाला सीन

तनुजा यांनी संपूर्ण गोष्ट सांगितल्यावर आईने उलट तनुजा यांना आणखी एक चापट मारली. कारण त्यांना तनुजा यांच्या वागण्याची चांगली कल्पना होती. आता तनुजा यांची अवस्था वाईट झाली होती. शोभना यांनी तनुजा यांना पुन्हा सेटवर नेले आणि केदार शर्माला सांगितले की, ती आता रडत आहे, शूटिंग सुरू करा. यानंतर तनुजाने परफेक्ट शॉट दिला. केदार शर्मा हे त्या काळातील नाराज दिग्दर्शकांपैकी एक मानले जात होते. तनुजा यांच्या आधी त्यांनी अनेक कलाकारांना थप्पड लगावली होती. मात्र, हीच थप्पड तनुजा यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेली.

हेही वाचा :

Raj Kundra : 2 महिने तुरुंगात काढल्यानंतर राज कुंद्रा कसे दिसतात?, फोटोंमध्ये पाहा बदललेला लुक

Khatron Ke Khiladi 11 : दिव्यांका त्रिपाठीला मागे टाकत अर्जुन बिजलानीने जिंकली KKK11ची ट्रॉफी

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.