Drishyam 2 : पुन्हा सस्पेन्स, पुन्हा रोमांच; दृश्यम-2 ची तयारी सुरु!

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बू (Tabu) यांचा दृश्यम (Drishyam)  या चित्रपटाला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले होते.

Drishyam 2 : पुन्हा सस्पेन्स, पुन्हा रोमांच; दृश्यम-2 ची तयारी सुरु!
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 11:49 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बू (Tabu) यांचा दृश्यम (Drishyam)  या चित्रपटाला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले होते. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे दृश्यम 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Hindi remake of Ajay Devgan and Tabu’s film Drishyam 2)

त्यानंतर आता याचा हिंदी रिमेकदेखील लवकरच येणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रसिद्ध निर्माते कुमार मंगत यांनी ‘दृश्यम 2’चे हक्क खरेदी केले आहेत. यासाठी त्यांना मोठी रक्कम देखील मोजावी लागली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दृश्यममधील पुढील भाग दाखवण्यात येणार असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे जिथे ही कथा संपते तिथूनच ‘दृश्यम 2’ची पुढील कथा सुरु होणार आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटातही तब्बू आणि अजय देवगण मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. एका रिपोर्टनुसार असे सांगितले जात आहे की, तब्बू आणि अजय या चित्रपटासाठी होकार दिला आहे. 2021 च्या शेवटी या चित्रपटाचे शूटिंग सुरुवात होणार असून 2022 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अजय देवगण आणि कुमार मंगत या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

दृश्यम’ हा चित्रपट मूळ मल्याळम भाषेत असून यात अभिनेते मोहनलाल मुख्य भूमिकेत दिसले होते. तर या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. तसंच या चित्रपटाचं दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केलं होतं. 2015 मध्ये ‘दृश्यम’ चा पहिला हिंदी भाग प्रदर्शित झाला होता, ज्ला चांगला प्रतिसाद मिळाला. अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेत्री श्रेया सरन मुख्य भूमिकेत होती.

संबंधित बातम्या : 

‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!

Sunny Leone | सनी लिओनीच्या कार नंबरचा दुरुपयोग, मुंबईत तरुणाविरोधात गुन्हा

Thalaivi | लवकरच ‘थलायवी’ प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

(Hindi remake of Ajay Devgan and Tabu’s film Drishyam 2)

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.