हिंदू जगातील सर्वांत सहिष्णू, भारताचा अफगाणिस्तान कधीही होणार नाही : जावेद अख्तर
हिंदू हे जगातील सर्वांत सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत. भारताचा कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण भारतीय लोक निसर्गत: कट्टरतावादी नाहीत, ते मध्यममार्गी भूमिका स्वीकारण पसंत करताना किंबहुना मध्यममार्ग त्यांच्या डीएनएमध्ये आहे, असं जावेद अख्तर म्हणाले.
मुंबई : ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर आपल्या रोखठोक मतांसाठी नेहमीच ओळखले जातात. त्यांनी अफगाणिस्तान परिस्थितीवर भाष्य करताना आरएसएसची तालिबानशी तुलना केली होती. त्यानंतर त्यांना बहुतेकांच्या टीकेला समोरं जावं लागलं. मात्र अनेकांनी त्यांची पाठराखही केली. आता त्यांनी एका मुलाखतीदरम्यान नवं वक्तव्य केलं आहे. ‘हिंदू जगातील सर्वांत सहिष्णू आहे, त्यामुळे भारताचा अफगाणिस्तान कधीच होऊ शकत नाही’, असं ते म्हणाले आहेत.
हिंदू हे जगातील सर्वांत सभ्य आणि सहिष्णू
“हिंदू हे जगातील सर्वांत सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत. भारताचा कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण भारतीय लोक निसर्गत: कट्टरतावादी नाहीत, ते मध्यममार्गी भूमिका स्वीकारण पसंत करताना किंबहुना मध्यममार्ग त्यांच्या डीएनएमध्ये आहे”, असं जावेद अख्तर म्हणाले.
मी कट्टरतावांद्यावर प्रहार करणारा माणूस
“मी तालिबानची बाजू घेतल्याचा माझ्यावर काही जणांनी आरोप केला. या पेक्षा हास्यास्पद आणखी कोणता आरोप असू शकतो. कारण मी सर्वच कट्टरतावादी लोकांवर आतापर्यंत प्रहार करत आलोय. त्यामुळे लोक माझ्यावर असे आरोप करत असतात”, असं जावेद अख्तर म्हणाले.
मी इतका मोठा माणूस नाहीय, अख्तर यांचा टोला
जावेद अख्तर फक्त हिंदू धर्मातील कट्टरतावादावर भाष्य करत असतात. ते मुस्लिम धर्मातील कट्टरतावादावर भाष्य करत नाही किंवा भूमिका घेत नाहीत, या आरोपावर देखील अख्तर यांनी उत्तर दिलं. “मी मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकबद्दल, पडदा पद्धतीविषयी किंवा इतर प्रतिगामी प्रथांविषयी नेहमी आवाज उठविला आहे. गेल्या काही वर्षांत मी काय काय केलंय, याविषयी काही लोक अनभिज्ञ असू शकतात. कारण मी इतका मोठा आणि महत्त्वाचा माणूस नाहीय की माझ्याबद्दल प्रत्येकाला माहिती असलंच पाहिजे”, असा टोलाही त्यांनी लगावला.
धर्मांध मुस्लिमांच्या धोक्यामुळे मला दोन वेळा पोलिस संरक्षण
“गेल्या 20 वर्षांत धर्मांध मुस्लिमांच्या धोक्यामुळे मला दोन वेळा पोलिस संरक्षण देण्यात आलं. ज्यावेळी देशात तिहेरी तलाकचा मुद्दा ऐरणीवर नव्हता, त्यावेळीही मी माझी मतं रोखठोक पद्धतीने व्यक्त केली. शिवाय मुस्लिम फॉर सेक्युलर डोमोक्रसी नावाच्या संस्थेसह मी देशभरात फिरलो. या दौऱ्यात देशभरातल्या मंचावरुन प्रतिगाम्यांच्याविरोधात आसूड ओढले. यादरम्यान एका टॅनेलवर मौलाना कल्बे जवाद या मुस्लिम धर्मगुरुशी पदडा पद्धतीच्या प्रथेवर जाहीर वादविवाद केला. यानंतर मला मुस्लिम धर्मातील कट्टरतावाद्यांचे धमकीचे फोन आले, मेल आले. त्यामुळे मी मुस्लिम कट्टरतावादावर बोलत नाही, हा आरोप निराधार आणि तथ्यहीन आहे”, असं जावेद अख्तर म्हणाले.
हे ही वाचा :
Shripad Chhindam Arrest :आधी शिवरायांचा अपमान, आता नवा कारनामा, श्रीपाद छिंदमला पुन्हा बेड्या
Ravi Shastri : टी 20 वर्ल्ड कपनंतर कोच कोण? सौरव गांगुलीचे मोठे संकेत